शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

चाकूच्या धाकावर लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2022 5:00 AM

मालवाहू चालक अनिल सुखदेव पाटील रा. सानेवाडी हा एम.एच.३२ क्यू. २०४६ क्रमांकाच्या मालवाहू वाहनातून ४०० लिटर डिझेल, १० लिटर पेट्राेल घेऊन म्हसाळा नजीकच्या बायपास रस्त्याने जात असताना दरोडेखोरांनी कार आडवी लावून चाकूचा धाकावर त्याचे अपहरण करीत कारमध्ये बसवून कान्होलीबारा येथील जंगलात सोडून देत मालवाहू वाहन आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून नेला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मालवाहू चालकाचे अपहरण करुन त्याला जंगलात सोडून चाकूचा धाक दाखवून वाहनासह डिझेल असा एकूण २ लाख ९५ हजार ४२० रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावून नेला होता. याप्रकरणाचा संयुक्त तपास सेवाग्राम पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा करीत असतानाच पोलिसांनी अवघ्या ४८ तासांच्या आत दरोडेखोरांचा शोध लावून तब्बल चौघांना बेड्या ठोकल्या तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये सूरज सहदेव चव्हाण रा. आमगाव खडकी, सोमेश वसंत उईके रा. महाबळा, विकास ऊर्फ जितू नामदेव चामलाटे रा. पंजाब कॉलनी वर्धा, सागर अरविंद वाघाडे रा. गजानन नगर, वर्धा यांचा समावेश असून दोन अल्पवयीनांना ही ताब्यात घेतले आहे. मालवाहू चालक अनिल सुखदेव पाटील रा. सानेवाडी हा एम.एच.३२ क्यू. २०४६ क्रमांकाच्या मालवाहू वाहनातून ४०० लिटर डिझेल, १० लिटर पेट्राेल घेऊन म्हसाळा नजीकच्या बायपास रस्त्याने जात असताना दरोडेखोरांनी कार आडवी लावून चाकूचा धाकावर त्याचे अपहरण करीत कारमध्ये बसवून कान्होलीबारा येथील जंगलात सोडून देत मालवाहू वाहन आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून नेला होता. याचा समांतर तपास गुन्हे शाखा आणि सेवाग्राम पोलीस करीत असतानाच त्यांना गुन्हा करताना एम.एच. ३१ ए. ई. ९५९९ क्रमांकाच्या कारचा वापर झाल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तपासाला गती दिली आणि चार आरोपींना बेड्या ठोकून दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, निरंजन वरभे, गजानन लामसे, रणजित काकडे, यशवंत गोल्हर, राजेंद्र जयसिंगपुरे, रितेश शर्मा, अभिजीत वाघमारे, प्रदीप वाघ, गोपाल बावणकर, अमोल ढोबाळे यांनी केली.

६.७४ लाखांचा माल अमरावती जिल्ह्यातून ‘रिकव्हर’-    आरोपींना ताब्यात घेत पोलिसी हिसका दाखविला असता त्यांनी सर्व मुद्देमाल अमरावती येथे विकल्याचे सांगितले. पोलीस पथक अमरावतीला रवाना झाले असता गुन्ह्यात वापरलेली कार, चार मोबाईल, तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपी दीपक सहदेव चव्हाण, सुनील पुंडलिक बारबुद्धे दोन्ही रा. गुरुकुंज मोझरी जि. अमरावती यांच्याकडून ४०० लिटर डिझेल जप्त करुन आर्वी सावळापूर शिवारात सोडलेला मालवाहू, बॅटरी असा एकूण ६ लाख ७४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींना सेवाग्राम पोलिसांच्या ताब्यात दिले.

 

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिस