शहरं
Join us  
Trending Stories
1
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
2
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
3
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
4
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
5
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
6
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
8
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
9
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
10
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
11
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
12
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
13
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
14
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
15
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
16
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
17
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
18
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
19
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल

कृपलानीची उत्तरे पालिकेला पोहोचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 10:16 PM

केसरीमल कन्या शाळेसमोर कृपलानी बंधूंनी केलेल्या बांधकामासंदर्भात तक्रारी झाल्यानंतर आता कृपलानी बंधूंनी नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना नोटिशीचे उत्तर सादर केले आहे. या उत्तरात कृपलानी यांनी बांधकामाला २०१२ मध्येच परवानगी देण्यात आली होती, असा दावा केला आहे.

ठळक मुद्देदोन वर्षांपासून निर्णय नाही । म्हणे, परवानगी मिळाली समजलो

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केसरीमल कन्या शाळेसमोर कृपलानी बंधूंनी केलेल्या बांधकामासंदर्भात तक्रारी झाल्यानंतर आता कृपलानी बंधूंनी नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना नोटिशीचे उत्तर सादर केले आहे. या उत्तरात कृपलानी यांनी बांधकामाला २०१२ मध्येच परवानगी देण्यात आली होती, असा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणात पालिका प्रशासन काय भूमिका घेते, हे आता महत्त्वाचे ठरणार आहे. कृपलानी यांच्यावतीने विक्रम अशोक कृपलानी यांनी ७ फेब्रुवारी २०१९ ला मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठविले असून यात त्यांनी वॉर्ड क्र.४ मधील घर क्र. २०७५, २०७६ वरील बांधकाम हे अवैध, परंतु सर्व परवानगी मिळण्याबाबत आमच्या बाजूने वेळोवेळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, असे म्हटले आहे. प्लॉट क्र .१३०७ हा काका किशोर कृपलानी यांच्या नावे होता. त्यांनी प्लॉटवर बांधकामाकरिता अर्ज केला होता. त्यानंतर बांधकामाबाबत २ मे २०१४ ला परवानगी देण्यात आली होती. प्लॉट क्र. १३०८ हा काकू पूनम किशोर कृपलानी यांच्या नावे होता. त्या प्लॉटवर बांधकामासाठी १७ एप्रिल २०१२ ला परवानगी देण्यात आली होती. तसेच हा प्लॉट रहिवासी आणि व्यवसायाकरिता नमूद करीत प्लॉटचे एकत्रिकरण करून बांधकाम करण्याबाबत नकाशासह २६ फेब्रुवारी २०१६ ला बांधकाम नूतनीकरण करण्याबाबत अर्ज केला होता. २६ फेब्रुवारीला अर्ज करूनही २७ नोव्हेंबर २०१८ पर्यंत कुठलाही आक्षेप आलेला नाही. मालमत्ता क्रमांक १३०७ हा विक्रम कृपलानी व संदीप कृपलानी यांना काकांनी बक्षीसपत्रावर दिला आहे. तसेच १३०८ ही मालमत्ता पूनम यांनी अशोक कृपलानी यांना दिली आहे. या उत्तरात विक्रम कृपलानी याने म्हटले आहे की, १३०७ व १३०८ ह्या दोन्ही मालमत्ता एकत्रित समजून यावर बांधकाम झाले. त्यामुळे कुठल्या अडचणी असल्यास कळवावे, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. हॉटेलबाबत नगरपालिकेकडे अर्ज केला होता. त्यावर नागरिकांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर हॉटेलसाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले, असा दावा विक्रम कृपलानी यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी उत्तरात केलेला आहे. बांधकाम नूतनीकरणाबाबत विनंती अर्ज केला, परंतु दोन वर्षांत पालिकेने कुठलेही निर्देश दिले नाहीत. यामुळे बांधकाम मंजूर आहे असे समजून मी युनियन बँक आॅफ इंडिया यांच्याकडून कर्ज घेऊन बांधकाम केले आहे. हे बांधकाम नियमित करावे, असेही या पत्रात कृपलानी यांनी म्हटले आहे. वर्धा नगर पालिकेच्या प्रशासनाने कृपलानी यांच्या बांधकामावर आजतागायत कोणतीही कारवाई केलेली नाही. या लेखी उत्तरानंतर पालिका प्रशासन काय कारवाई करते, हे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Schoolशाळा