लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गांधी व जिना यांच्या व्यक्तिमत्त्वात समानता होती. दोघेही वकील होते. दोघांचेही उच्च शिक्षण व जन्म गुजरातमध्ये झाला. दोघांचेही राजनैतिक गुरू गोपाळकृष्ण गोखले होते. गांधींनी राजनीतीचा धर्म स्वीकारला. जिनांनी राजनितीचा विपर्यास शोधला.मुंबईच्या मलबारहिलसारख्या भागात जिनांचे वास्तव्य होते, तर गांधी नेहमी जमिनीवरील लोकांशी जुळून राहिले. गांधीजींच्या जीवनाचे २ हजार ३३८ दिवस कारागृहात गेले, तर जिनांचा एकही दिवस कारागृहात गेला नाही. जिनांची राजनीती व जीवनशैली याच्या परस्परविरोधी गांधीजींची तत्व शैली होती. काँग्रेस पक्षात गांधी-जिना एकमेकांना ओळखत नव्हते. त्यांची मैत्री झाली नाही, असे प्रतिपादन गांधी पीस फाउंडेशनचे अध्यक्ष कुमार प्रशांत यांनी केले. मगनसंग्रहालय व राष्ट्रीय युवा संघटन यांच्या वतीने ‘महात्मा गांधी के साथ इतिहास कि यात्रा’ या अंतर्गत तीन दिवसीय व्याख्यानमालेत ते बोलत होते.पहिल्या पुष्पात मोहम्मदअली जिना आणि महात्मा गांधी या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या दिवशी सरदार पटेल व महात्मा गांधी, त्यानंतर ३० जानेवारी हे राम या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना कुमार प्रशांत म्हणाले, खिलापत चळवळीच्या माध्यमातून मौलाना आझाद यांचे नेतृत्व उदयाला आले. यात हिंदू-मुस्लिम ऐक्य भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात एकत्रित आले. त्यामुळे जिनांची प्रतिमा धुमील झाली. जिनांनी गांधीजींवरची काँग्रेस पक्षाचे महत्त्व कमी केले. त्यामुळे जिनांनी नंतर काँग्रेसचा ३० आॅक्टोबर १९२० ला राजीनामा दिला व ते मुस्लिम परपंरा पाळू लागले, असे प्रतिपादन कुमार प्रशांत यांनी केले.