शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

गुळगुळीत महामार्गावर सुविधांचा अभाव, ६० चक्का ट्रकचा पंधरवड्यापासून मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 4:43 PM

हुसनापूर टोल नाक्यावरील प्रकार : दुचाकीस्वारांचे अपघात, व्यवस्थापकाचे दुर्लक्ष, वाहनचालकांकडून व्यक्त होत आहेत संताप

लोकमत न्यूज नेटवर्क भिडी : प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून रस्ते गुळगुळीत करण्यात आले. दिलेल्या सुविधेचा खर्च वसूल करण्यासाठी टोल नाके बांधण्यात आले. मात्र, या मार्गावरून अवजड वाहने जाण्याची सुविधाच नसल्याने गत पंधरवड्यापासून ६० चक्का ट्रकने टोल नाक्यावर मुक्काम ठोकला आहे. व्यवस्थापकाचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने पंधरवड्यात काही दुचाकीचे अपघात झाले असून या प्रकाराचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यात ग्रामीण मार्गासह, राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणण्यात आले. यात हजारो कोटी रुपये खर्ची करून समृद्धी मार्गाचाही समावेश आहे. मात्र, या मार्गावरून इतिवहजड वाहनांना जाण्याची व्यवस्था नसल्याने वाहन चालकांची मोठी दमछाक होत आहे. मथुरा येथून एनएलओ / एएच ०१०० क्रमांकाचा ६० चाकांचे अवडजड मालवाहू गिट्टी मिक्सर मशीन घेऊन नांदेड येथे निघाला. दरम्यान अनेक अडचणींवर मात करून हुसनापूर टोल नाक्यावर हे वाहन आले. मात्र, पुढे जाण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने या वाहनाला टोल नाक्यावरच मुक्काम करावा लागला आहे. गत १७ दिवसांपासून है वाहन एकाच ठिकाणी असल्याने दुचाकी, तीनचाकी वाहनांना वाहतुकीस अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मात्र, यात अजूनही टोल नाका व्यवस्थापकांनी यावर मार्ग काढला नसल्याने आणखी किती दिवस या ठिकाणी मुक्काम करावा, असा प्रश्न वाहन चालक, वाहकांपुढे पडला आहे. तातडीने यावर मार्ग काढावा अशी मागणी होत आहे.

वाहनांनुळे अपघात दुचाकी, तीनचाकी वाहनधारकांनी सुरुवातीलाच टोल वसूल करण्यात आल्याने या टोल नाक्यावरून त्यांना टोल शुल्क द्यावे लागत नाही. निःशुल्क वाहनांच्या रांगेशेजारी है अवजड वाहन उभे करण्यात आल्याने मार्ग काढताना अडचण होत आहे. यात काही दुचाकींना अपघात झाले. यात किरकोळ जखमा आल्याने थोडक्यात बचावले. मात्र, मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर है वाहन हटवावे अशी मागणी करण्यात आली. टोल व्यवस्थापकांचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

आधुनिक विकासाची हीच शोकांतिकाअद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, हजारो कोट्यांवधी रुपये खर्ची घालून आधुनिक विकास साधला जातो आहे. एवढेच काय तर आपत्कालीन स्थितीत देशात विणलेल्या महामार्गावर फायटर जहाज, विमान उतविल्याचे प्रयोग करण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे अतिवजड वाहनांना या मार्गावरून नेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. आधुनिक विकासाची ही शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाwardha-acवर्धा