शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

मोकाट गुरांमुळे वाहतुकीचा बोजवारा

By admin | Published: August 21, 2016 12:39 AM

वर्षातील आठ महिने बेपत्ता असलेली गुरे पावसाळ्याची चार महिने रस्त्यावर दिसतात.

नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : रस्त्यावरील जनावरांमुळे अपघाताच्या संख्येत वाढपुलगाव : वर्षातील आठ महिने बेपत्ता असलेली गुरे पावसाळ्याची चार महिने रस्त्यावर दिसतात. प्रत्येक वर्षी हा प्रकार घडत असल्याने पावसाळ्यातच मोकाट गुरांची समस्या का निर्माण होते, हा प्रश्नच आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर दिसणाऱ्या मोकाट गुरांमुळे वाहतुकीचा मात्र बोजवारा उडत आहे. पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत असंतोष पसरला आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. शहर व परिसरातील वाढत्या लोकसंख्येसोबतच दुचाकी चारचाकी वाहनांची संख्याही वाढत आहे. पूर्वी सायकल घेऊन फिरणारी व्यक्ती मोटर सायकल, कारने फिरू लागली. युवकांची ‘रॅश ड्रायव्हींग’ वाढली आहे; पण शहरातील रस्ते वेगात वाहने चालविण्यासारखे राहिले नाहीत. खाचखळग्यांनी व्यापलेले रस्ते दुरूस्त करता येतात; पण वर्दळीच्या रस्त्यावर चौकात बसलेली जनावरे सतत वाहतुकीची कोंडी करताना दिसतात. रस्त्यातील या गतिरोधकांमुळे वाहतुकीची कोंडी होते. शहरातून नागपूर-मुंबई द्रुतगती मार्ग, हैदराबाद-भोपाळ, अहेरी-धारणी राज्यमार्ग जातात. कमी वेग आणि इंधन वापरून लवकर पल्ला गाठण्याच्या दृष्टीने या सर्व मार्गावर जड वाहने, बसेस, कार, दुचाकी आदी वाहनांची रहदारी वाढली आहे. यातच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. यामुळे या मार्गांवर वाहने चालविणे म्हणजे जीवावर बेतणारेच ठरत आहे. शहरातून जाणाऱ्या या मार्गावरील नाचणगाव, कुर्ला वस्ती, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दिनदयाल चौक तर देवळीकडून येणाऱ्या मार्गावर नगर परिषद हायस्कूल, पोस्ट आॅफिस, कॉटन मील आदी ठिकाणी दिवस-रात्र डेरा टाकून बसणारी मोकाट जनावरे गतिरोधकाचे काम करतात. यामुळे भरधाव वाहन चालकास कधी-कधी वाहने नियंत्रीत करणे त्रासदायक ठरते. ही जनावरे इतकी निगरगट्ट आहेत की, वाहन जवळ येऊनही रस्त्यातून उठत नाही. शेवटी वाहन चालकालाच बाजूने वाहन काढावे लागते. अशावेळी समोरून वाहन आल्यास अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. अशीच स्थिती शहरातील अंतर्गत रस्त्यांचीही आहे. दिर्घ काळ टिकावे म्हणून डांबरीकरण झालेल्या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले; पण या सिमेंट रस्त्यांनीही लवकरच आपले अंतरंग दाखविले. रस्त्यावर नागरिकांनी आपल्या सोयीप्रमाणे ठिकठिकणी गतिरोधक निर्माण केले. मध्यंतरी पाणी पुरवठ्याच्या नवीन जलवाहिन्यांसाठी सिमेंट रस्ते खोदण्यात आले. यामुळेही या रस्त्यावर नाल्या तयार झाल्या. त्या नगर प्रशासनाने न बुजविल्याने पावसामुळे त्यातील माती दबून लांबलचक नालीरूपी खड्डे पडले आहेत. यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. नगर पालिका तसेच बांधकाम विभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)