लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लहानपणी केसाच्या गुंतवळीवर फुगे किंवा तत्सम बारीकसारीक वस्तू मिळायच्या. त्याची वेगळी अपूर्वाई होती. आता याच गळालेल्या एक किलो केसांवर महिलांना तब्बल एक ग्रॅम सोने मिळत आहे. यामुळे केस सांभाळून ठेवण्यावर व ते विकण्यावर महिलावर्गाकडून विशेष भर दिला जात आहे. (Ladies, give your hair back, bring gold in return )५० ग्रॅम केसांना २०० रुपयांहून अधिक भाव मिळत आहे. त्यामुळे महिलांनी केस विंचरताना गळलेल्या केसांचा पुंजका फेकणे बंद केले आहे. आता प्रत्येक पुंजका तन्मयतेने साठवून ठेवला जात आहे. पूर्वी गल्लोगल्ली केसांवर फुग्यांची खरेदी केली जायची. मग फुग्यांची जागा भांड्यांनी घेतली. आता मात्र केस वजनाने खरेदी केले जात आहेत.दीड वर्षांपूर्वी २ हजार रुपये किलोने विकले जाणारे केस सध्या दुप्पट भावाने खरेदी केले जात आहेत. केसांना कमी - अधिक ४ हजार रुपये भाव मिळत असल्याने महिला केस सांभाळून ठेवत आहेत. विदेशात भारतीय केसांना मोठी मागणी आहे. त्यापासून केसांचे विग, हेअर पिसेस बनविली जातात. व्याधीग्रस्त महिलांच्या डोक्यावरील केस निघून जातात. त्यांना हेच विग वापरावे लागतात.मागील वर्षभरात लॉकडाऊनमुळे केस खरेदीवर मोठा परिणाम झाला होता. आता या व्यवसायात तेजी आली आहे. ग्रामीण व शहरी भागात किरकोळ विक्रेते केस खरेदी करतात. सोबत पिशवी व अमूल्य वस्तू मोजण्यासाठी छोटा तराजू असतो. दर महिन्याला ग्रामीण भागात १ ते २ किलो केस जमा होतात. मोठे व्यापारी गल्लोगल्ली फिरुन भांड्यांवर केस विकणा?्यांकडून केस जमा करतात. काळ्या निरोगी केसांना जास्त भाव मिळतो. या विक्रेत्यांकडे काळे, लाल, सोनेरी, सरळ, कुरळे केस असेही प्रकार असतात. भारतातून युरोप, आफ्रिका या देशात केसांची निर्यात होते.