आॅनलाईन लोकमतसेवाग्राम : देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता. सर्वत्र जल्लोष सुरू असताना देशात हिंसाचाराने थैमान घातले होते. हाच हिंसाचार रोखण्याकरिता महात्मा गांधी २५ आॅगस्ट १९४६ रोजी सेवाग्राम आश्रमातून निघाले ते परत न येण्यासाठीच. सत्य व अहिंसेचे व्रत जीवनभर अंगिकारणाºया महात्मा गांधीजींची हत्या विद्वेषीवृत्ती आणि सनातनातून झाली. राष्ट्रपित्याला जावून ७० वर्ष झाली. मात्र त्यांचे विचार, कार्य व तत्व जगासाठी दीपस्तंभ बनले. जगातली विचारवंत प्रेरणा व ऊर्जा घेण्यासाठी आजही त्यांच्या सेवाग्राम आश्रमात येतात.देशाला स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय साबरमतीमध्ये परतणार नाही असा संकल्प करून महात्मा गांधी हे दांडी मार्चसाठी आश्रमातून निघाले. तुरूंगवासातून मुक्तता झाल्यानंतर जमनालाल बजाज यांच्या विनंती व आग्रहावरून १९३४ ला वर्धा आणि १९३६ मध्ये सेवाग्रामला वास्तव्य केले. आपली स्वार्थी तृष्णा भागविण्यासाठी जग सारखे धावत आहे. यामध्ये सामान्य व दुबळ्यांचे शोषण केल्या जात आहे. शंभर वर्षापूर्वी महात्मा गांधींनी हे ओळखले. शोषणमुक्त अहिंसक जीवन कसे असू शकते हे सूत्र रस्कीन, टालस्टॉय यांच्या विचारातून हाती आले. सत्य, श्रम, स्वावलंबन, अपरिग्रह या विचारांवर सेवाग्राम आश्रमची स्थापना झाली. स्वातंत्र्य चळवळ, रचनात्मक कार्यक्रम, चारित्र्य संपन्न महापुरूष, नेते, कार्यकर्ता व साधक येथूनच राष्ट्र उभारणीच्या कामी आले.सेवाग्राम आश्रम जगासाठी मॉडेल बनले. साधी राहणी, कमीत कमी गरजा, प्रकृतिच्या सानिध्यातील जीवन कसे जगता येते, हे गांधीजींनी दाखवून दिले. बापूंचा आश्रम नियमावर होता आणि नियमांचे पालन सर्वांसाठी बंधनकारक होते. गांधीजींच्या काळातील व्यवस्था व कार्य आजही येथे जोपसल्या जातात. यात प्रार्थना, श्रमदान, कताई, विणकाम आदी असून शेती आणि गोशाळेचीही परंपरा कायम आहे.लाखोंच्या संख्येनी पर्यटक, दर्शनार्थी आणि अभ्यासक आश्रमला भेट देवून जातात. आश्रमातील वातावरण, स्मारकांचा इतिहास आणि बापूंच्या वास्तव्याची भूमी यामुळे एक वेगळीच भावना निर्माण होवून जाते. जगाच्या पाठीवर अहिंसेचे तत्व जीवनभर अंगिकृत करणारे महात्मा सुकरान यांना त्यांच्याच देशातील लोकांनी विष पाजले. महात्मा येशूंना सुळावर चढविले आणि महात्मा गांधीजींना मारण्यासाठी आपल्याच देशातील एकाने हत्याराचा उपयोग केला.बापूंना जावून ७० वर्षे झाली. पण जग आणि जगातील मानवासाठी बापूंच्या विचाराशिवाय पर्याय नाही. देशात जी विध्वसंक स्थिती निर्माण करण्यात आली योच समाधान पण त्यांच्याच तत्वातून सापडेल. जग बापूंच्या विचाराभोवती फिरत असल्याने आश्रमाकडे लोकांचा ओढा वाढल्याचे दिसून येते.
राष्ट्रपित्याचे जीवन कार्य जगासाठी दीपस्तंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:46 PM
देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता. सर्वत्र जल्लोष सुरू असताना देशात हिंसाचाराने थैमान घातले होते. हाच हिंसाचार रोखण्याकरिता महात्मा गांधी २५ आॅगस्ट १९४६ रोजी सेवाग्राम आश्रमातून निघाले ते परत न येण्यासाठीच.
ठळक मुद्देविचारवंत प्रेरणा व ऊर्जा घेण्यासाठी आजही येतात आश्रमात