लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत केळापूर नजीक कापूस गाठी घेवून जाणारा ट्रक जळाला होता. ही केवळ घटना नसून तो योजनाबद्ध कट असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. यात ट्रक चालकाला अटक केल्यानंतर त्याला दाखविलेल्या पोलिसी हिसक्यात सर्वच उघड झाले आहे. त्याने हा प्रकार ट्रक मालक व त्याच्या मित्राच्या मदतीने केला असल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी पहिले ट्रक चालक आशिष गोहाड याला अटक करण्यात आली होती. त्याने हा प्रकार ट्रक मालक सोनू उर्फ जयराम यादव आणि त्याचा मित्र दलविरसिंह उर्फ मोनू बलदेवसिंह गरेवाल दोघेही रा. रमाई नगर नागपूर यांच्या मदतीने गाठी लंपास करून जाळल्याचे सांगितले. शिवाय या प्रकरणात त्यांना दाऊदअली उर्फ बंपर रहेमानअली रा. तारफैल आणि रवींद्र उर्फ गबरू गोपाल डेलीकर रा. स्टेशनफैल वर्धा यांनी मदत केल्याचे सांगितले. या चौघांनाही अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या व्यतिरिक्त आणखी दोघे आहेत.चोरट्यांकडून कपाशीच्या ८८ गाठी जप्त केल्या. त्याची किंमत १६.६४ लाख रुपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी आरोपी असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पुलगावचे ठाणेदार एम. बुराडे यांनी दिली.पवनारच्या व्यापाºयाला विकल्या गाठीट्रक चालक आशिष गोहाड हा अंजनगावसुर्जी येथून कापसाच्या १०० गाठी घेवून निघाला. दरम्यान वर्धेलगत ट्रक मालक सोनू यादव व त्याच्या मित्राच्या मदतीने त्याने ९५ गाठी पवनार येथील एका व्यापाºयाला विकल्या. यानंतर सदर ट्रक केळापूर लगत नेत त्यात काही गाठी ठेवत तो ट्रक पेट्रोल टाकून जाळला. याची तक्रार पुलगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली. या प्रकरणी कापूस गाठी मालक दीपक मंत्री यांनी ट्रक जळाला नाही तर तो जाळल्याचा संशय व्यक्त केला. यावरून पोलिसांनी तपास केला असता हा प्रकार उघड झाला.
ट्रक मालकाच्या मदतीने गाठी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 1:23 AM
पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत केळापूर नजीक कापूस गाठी घेवून जाणारा ट्रक जळाला होता.
ठळक मुद्देपाच जणांना अटक : कापूस गाठीचा ट्रक जाळल्याचे प्रकरण