शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

भुयारी गटार योजना लोकाभिमुखच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 9:42 PM

केंद्र शासनाचे अमृत अभियानांतर्गत भुयारी गटार योजना तयार करण्याचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने वर्धा शहरासाठी भुयारी गटार योजना तयार करण्याचे मान्य केले.

ठळक मुद्देअतुल तराळे : नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र शासनाचे अमृत अभियानांतर्गत भुयारी गटार योजना तयार करण्याचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने वर्धा शहरासाठी भुयारी गटार योजना तयार करण्याचे मान्य केले. सदर योजनेच्या माध्यमातून वर्धा शहरातील विविध भागात कामे सुरू असून लोकाभिमुख असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामे पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी केले आहे.नगर पालिका यांच्याकडे योग्य तो तांत्रिक कर्मचारी वर्ग नसल्यामुळे भुयारी गटार योजना करण्यात तज्ञ असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडून योजना तयार करून त्या योजनेचे कामावर त्यांचकडूनच देखरेख करून घेण्यात यावी. तसेच योजना कशाप्रकारे तयार करावी याबाबत केंद्र सरकार तसेच संबंधित विभागाकडून सीपीएचईईओ मॅन्युअल नुसार योजना तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सदर सुचनांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून वर्धा शहराचे सर्वेक्षण करण्यात आले. शहराची भौगोलिक रचना लक्षात घेता शहराचे सहा झोन तयार करण्यात आले. शिवाय एसटीपी झोनची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर आराखडे, नकाशे यांची तपासणी करून सचिव स्तरावरून मंजूरी प्रदान करण्यात आली. योजनेची किंमत १०१.२२ कोटी, वित्तीय आकृतिबंध, केंद्रशासन अनुदान ५० टक्के ५०.६१ कोटी, राज्य शासन अनुदान २५ टक्के २५.३० कोटी, लोकवर्गणी २५ टक्के २५.३० कोटी आहे. योजनेमध्ये ८५ कि़मी लांबीची मलवाहिनी टाकणे, डबल वाल करोगेटेड पाईप १५० मि.मी. ते २५० मि.मी. तसेच आर.सी.सी. पाईप ३०० मि.मी. ते ८०० मी.मी. साईजपर्यंत टाकुन १७ एमएलडी विक्रमशिला झोनमध्ये व बोरगाव झोन मधील नाल्यावर बंधारा बांधने व ५ ठिकाणी रेल्वे रूळाखालून पाईप लाईन टाकणे प्रस्तावित आहे. सन २०५० चे प्रस्तावित लोकसंख्येनुसार ही योजना आहे. विविध बाबी लक्षात घेऊन संपूर्ण शहरात टाकायवयाच्या पाईप लाईनचा व्यास निश्चित झाला आहे. पाण्याचे स्त्रोत दुषित होऊ नये यासाठी ही भुयारी गटार योजना फायद्याची असल्याचे नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी कळविले आहे.योजनेचे फायदेडासांची निर्मिती कमी होईल. शहर स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होईल. दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार नाही. पाण्याचे स्त्रोत दुषित होणार नाही, असे नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी कळविले आहे.