शहरं
Join us  
Trending Stories
1
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
2
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
3
गोपनीय दौरा; खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा दरेगावी उतरले
4
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
5
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
6
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली
7
'कासव'गतीनं नऊ हजारी पल्ला गाठणारा भारतीय फलंदाज ठरला किंग कोहली
8
"भाजप तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करतंय", PCS परिक्षेवरून प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल
9
श्रीकांत शिंदेंनी विना परवानगी महाकाल मंदिराच्या गर्भगृहात केली पूजा; काँग्रेस नेते आक्रमक
10
"बऱ्याच गोष्टी डोक्यात, सध्या काहीही...";फडणवीसांची भेट घेतल्यानंतर झिशान सिद्दिकींची पहिली प्रतिक्रिया
11
ठाकरेंनी सांगोल्यातून कुणाला उतरवले मैदानात?; शहाजीबापू पाटलांचे वाढले टेन्शन!
12
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची निशाणी मशाल घराघरात पोहचवा; उद्धव ठाकरेचं आवाहन
13
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा; "शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबई एअरपोर्टवर.."
14
लाजवाब! Sarfaraz Khan चा लवचिक अंदाज अन् त्यानं मारलेला कडक फटका बघाच (VIDEO)
15
Yahya Sinwar Death: याह्या सिनवारनंतर हमासची कमान कोण सांभाळणार? 'हे' टॉप ५ लीडर शर्यतीत...
16
ठाकरेसेनेची सत्तारांविरोधात मोठी प्लॅनिंग; थेट भाजपा नेत्याला पक्षात घेणार,२०० गाड्या मुंबईकडे
17
"आई, मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला जातेय"; कुटुंबीय वाट पाहत राहिले पण मुलगी घरी आलीच नाही
18
आप नेते सत्येंद्र जैन यांना अखेर जामीन मंजूर; तब्बल 18 महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर
19
भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात? 
20
Kareena Kapoor : सैफ नव्हे 'या' अभिनेत्यासाठी वेडी झाली होती करीना कपूर; बाथरूममध्ये लावलेले पोस्टर

गौण खनिजातून १७ वर्षांत आष्टीने कमविले ३४ कोटी

By admin | Published: May 08, 2017 12:33 AM

गौण खनिजाच्या माध्यमातून २००१ ते २०१७ या काळात तालुक्यातून शासनाला ३४ कोटी रुपयांचा गौणखनिज महसूल प्राप्त झाला आहे.

तरीही रस्ते विकासाकरिता निधी देण्यास नकार लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : गौण खनिजाच्या माध्यमातून २००१ ते २०१७ या काळात तालुक्यातून शासनाला ३४ कोटी रुपयांचा गौणखनिज महसूल प्राप्त झाला आहे. यातून तालुक्याच्या विकासकामांवर केवळ ५० लक्ष रुपये मिळाल्याची माहिती आहे. तालुक्यातून एवढा महसूल गौणखनिजाच्या माध्यमातून मिळत असताना तालुक्याच्या विकासाकरिता शासनाकडून पाठ दाखविण्यात येत असल्याने तालुका वासीयांकडून संताप व्यक्त होत आहे. रेतीघाट लिलाव झाल्यानंतर प्रचंड क्षमतेच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे ग्रामीण या भागातील रस्त्यांची वाट लागली आहे. चिंचोली अ‍ॅप्रोच रोड २ किमी, गोदावरी रस्ता २.५०० किमी, भिष्णुर रस्ता ५ कि़मी., टेकोडा येथील १.५०० कि़मी. चा हा रस्ता वाहन चालविण्यायोग्य नसल्याचे दिसून आले आहे. काळ्या मातीचा भाग असल्याने जडवाहने जाताच रस्त्यांवर खड्डे पडतात. कुण्या ग्रामस्थाची प्रकृती बिघडल्यास त्याला खाटेवर टाकून रस्त्यावर्यंत आणावे लागत असल्याचे वास्तव आहे. खासदार व आमदारांनी येथे एकदा भेट देत पावसाळ्यात गावातील २.५०० कि़मी. चा हा रस्ता पायी चालून दाखवावे असे आव्हान उपसरपंच राजू कुरवाडे यांनी केले आहे. शासनाला १७ वर्षांत ३४ कोटीचा महसूल मिळाला. त्यात एकट्या गोदावरी गावाचा नऊ कोटीचा महसूल आहे. असे असताना या गावाला अद्याप निधी न मिळणे ही शोकांतिका शोकांतीकाच म्हणवी लागेल. सुरू सत्रात या गावाला निधी देण्याची मागणी आहे.