लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : यंदाच्या वर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे जलशयांमधील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झाली नाही. अशातच सध्या विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होत असून हरित महाराष्ट्र या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून लावण्यात आलेली रोपटी आता पाण्याअभावी अखेरची घटका मोजत असल्याचे नजीकच्या सहेली येथे दिसते. त्यामुळे वृक्षलागवड उपक्रमाच्या उद्देशालाच बगल मिळत असून संबंधितांनी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सुरूवातीला शेतकऱ्यांना सहन करावा लागला. तर आता हिवाळ्याच्या दिवसातच जलसंकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नळयोजनेद्वारे ग्रामस्थांना सध्या तीन ते चार दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा केल्या जात आहे. त्यातच सहेली येथे ग्रा.पं.च्यावतीने लावण्यात आलेली रोपटे पाण्याअभावी करपत असल्याचे बघावयास मिळते. मोठा निधी खर्च करून सदर रोपटे लावण्यात आली. मात्र, आता ती अखेरची घटका मोजत आहे. याबाबत ग्रामसेवक धुर्वे यांना विचारणा केली असता रोपट्यांना जगविण्यासाठी पाणीच नसल्याचे व पाण्या अभावी रोपटे करतप असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे वृक्ष संवर्धनाच्या उद्देशालाच बगळ मिळत आहे.
सहेलीतील रोपटी मोजताय अखेरची घटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:14 AM
यंदाच्या वर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे जलशयांमधील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झाली नाही. अशातच सध्या विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होत असून हरित महाराष्ट्र या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून लावण्यात आलेली रोपटी आता पाण्याअभावी अखेरची घटका मोजत असल्याचे नजीकच्या सहेली येथे दिसते.
ठळक मुद्देग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष : पाणीटंचाईच्या झळा