शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

नामांकनासाठी अखेरचे दोन दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 6:00 AM

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच उमेदवारी मिळविण्यासाठी धावपळ उडाली. युती आणि आघाडीच्या उमेदवारांनासह इतरही पक्षाचे आणि अपक्ष उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार २७ सप्टेंबरपासून नामांकन अर्ज घेण्याकरिता सुरुवात केली. आजपर्यंत वर्धा, देवळी, आर्वी व हिंगणघाट या चारही विधानसभा मतदार संघातून १४४ उमेदवारांनी तब्बल २७४ अर्जांची उचल केली आहे.

ठळक मुद्देसुट्यांचा खोडा : मंगळवारपर्यंत १४४ जणांकडून २७४ अर्जाची उचल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होताच जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघातून नामनिर्देशन अर्जाची उचल सुरु झाली. अर्ज भरण्याकरिता आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. पण, त्यामध्ये दोन सुट्या आल्याने आता नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याकरिता केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहे. त्यातही उद्याची गांधी जयंतीची सुटी असल्यामुळे दोन दिवसच उमेदवारांच्या हाती असल्याने गुरुवार आणि शुक्रवारी नामनिर्देशन भरण्याकरिता उपविभागीय कार्यालयात उमेदवारांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच उमेदवारी मिळविण्यासाठी धावपळ उडाली. युती आणि आघाडीच्या उमेदवारांनासह इतरही पक्षाचे आणि अपक्ष उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार २७ सप्टेंबरपासून नामांकन अर्ज घेण्याकरिता सुरुवात केली. आजपर्यंत वर्धा, देवळी, आर्वी व हिंगणघाट या चारही विधानसभा मतदार संघातून १४४ उमेदवारांनी तब्बल २७४ अर्जांची उचल केली आहे. यामध्ये हिंगणघाट आणि वर्धा विधानसभा मतदार संघात अर्जाची उचल करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत वर्धा विधानसभा मतदार संघातून ४४ जणांनी ८० अर्जांची उचल केली. हिंगणघाटमध्ये ४८ उमेदवारांनी ५०, देवळीमध्ये ३२ उमेदवारांनी ८३ तर आर्वी विधानसभा क्षेत्रातून २० जणांनी ६१ अर्जांची उचल केली आहे. या चारही मतदार संघात केवळ आर्वी येथेच एका अपक्ष उमेदवाराने नामनिर्देशन भरले आहे. आज नामनिर्देशन अर्ज भरण्याकरिता दिलेल्या आठ दिवसाच्या कालावधीपैकी पाच दिवस उलटले आहे.पण, अद्यापही वर्धा, देवळी आणि हिंगणघाटमध्ये एकही अर्ज दाखल झालेला नाही.उद्याला गांधी जयंतीची सुटी आल्याने दोनच दिवस उमेदवारांच्या हाती आहे. त्यामुळे आज काही उमेदवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु केली होती. आता गुरुवार आणि शुक्रवारी पक्षांच्या उमदेवारांकडून शक्तिप्रदर्शनाव्दारे उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.निवडणूक काळात सुट्यांचा सप्ताहनिवडणूक कार्यक्रमानुसार २७ स्पटेंबर ते २५ ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीत जवळपास सात सुट्या आल्या आहेत. नामांकन अर्ज भरण्याच्या दुसºयाच दिवशी सर्वपित्री अमावश्या, तिसºया दिवशी घटस्थापना आणि सहाव्या दिवशी महात्मा गांधी जयंतीची सुटी आल्याने अर्ज भरण्याच्या कालावधीतच तीन सुट्यांचा अडथळा निर्माण झाला. त्यानंतर ४ आक्टोबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून ५ आक्टोबरला अर्जाची छाननी होणार आहे. दुसºया दिवशी रविवार असल्याने ७ ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याचा शेवटा दिवस आहे. त्यानंतर ८ ऑक्टोबरपासून प्रचाराला सुरुवात होणार आहे.पण, त्याच दिवशी दसरा असल्याने सुटी आली आहे. प्रचाराकरिता बारा दिवस दिले असून त्यातही दसरा, कोजागिरी पोर्णिमा व संकष्ट चतुर्थी अशा सुट्या आल्या आहे.१९ ऑक्टोबर या बाराव्या दिवशी प्रचार तोफा थंडावणार असून दुसऱ्या दिवशी रविवार आहे. त्यानंतर सोमवारी मतदान होणार आहे. दोन दिवसाच्या प्रतीक्षेनंतर २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार असून पुन्हा २५ ऑक्टोबरला दिवाळीची सुटी आहे. त्यामुळे विजयी उमेदवार यावर्षी निकालांती दिवाळी साजरी करणार आहे. पण, अल्प कालावधीत मतदारांपर्यंत पाहोचण्याकरिता उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.डॉ. पंकज भोयर गुरुवारी दाखल करणार नामांकनवर्धा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर गुरुवारी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. दुपारी १ वाजता शिवाजी चौकातून पायदळ मिरवणूक काढून उपविभागीय कार्यालयात ते अर्ज दाखल करतील.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019