पर्यावरण बचावचा संदेश : विद्यार्थी, सामाजिक संघटना, अधिकारी, पदाधिकाऱ्यांचा सहभागआर्वी : ‘लोकमत इनिशिएटिव्ह’ला ओ देत आर्वीत ‘दर शुक्रवारी नो व्हेईकल’ला जनजागृती रॅलीने शानदार शुभारंभ झाला. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी, ‘एक दिवस गाडीशिवाय, नो व्हेईकल डे पाळा, प्रदूषण टाळा, वृक्ष लावा, हरित क्रांतीचा पुरस्कार करा, अशा घोषणा देत मुख्य मार्गाने ‘नो व्हेईकल’चा पाळण्याचा संदेश दिला.शहरात शुक्रवारी सकाळी ९ वाजता विश्रामगृह येथून जनजागृती रॅलीचा शुभारंभ माजी आमदार दादाराव केचे, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे तथा नो व्हेईकल डे कृती समितीचे अध्यक्ष डॉ. अरुण पावडे यांच्या हस्ते करण्यात आला. रॅली शिवाजी चौकातून इंदिरा चौक, वलीसाहेब वॉर्ड, गांधी चौक, पं.स. परिसर पद्मावती चौक मार्ग विश्रामगृहात परतली. येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीत आर्वीतील कन्नमवार विद्यालयातील हरित सेना, गांधी ज्यूनिअर विज्ञान महा.चे विद्यार्थी, एनसीसी पथक मॉडेल ज्यूनिअर कॉलेजचे हरित सेनेचे विद्यार्थी, विद्यार्थिनींनी हातात प्रदूषण टाळाचे फलक घेऊन नो व्हेईकल डे च्या घोषणा दिल्या.शहरात ठिकठिकाणी या रॅलीचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. शुक्रवार हा दिवस आर्वीकरांनी नो व्हेईकल डे म्हणून पाळावा, असा संदेश जनजागृती रॅलीतून देण्यात आला. रॅलीत इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पावडे, लॉयन्सचे अध्यक्ष डॉ. रिपल राणे, अॅड. देशपांडे, नागरी बँके अध्यक्ष अनिल जोशी, प्राचार्य प्रा.डॉ. हरिभाऊ विरूळकर, प्राचार्य प्रा. अभय दुर्गे, बाळकृष्ण केचे, प्रदीप मोकदम, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे दीक्षित, प्रकाश राठी, डॉ. नंदकिशोर कोल्हे, तालुका पत्रकार संघ, शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, रोटरी क्लब, लायन्स, रेणूका फाऊंडेशन, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, आम्ही आर्वीकर, पर्यावरण प्रेमी मंडळींनी रॅलीत सहभाग घेतला.(तालुका प्रतिनिधी)पुढल्या शुक्रवारी सायकल रॅलीआर्वीत पुढील शुक्रवार हा सायकल रॅलीने साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला. शिवाय आर्वीकरांत नो व्हेईकल डे बाबत जनजागृती केली जाईल. समारोपप्रसंगी डॉ. पावडे यांनी भूमिका विषद केली. प्रास्ताविक व संचालन प्रा. सव्वालाखे यांनी केले.
आर्वीत जागर रॅलीने ‘नो व्हेईकल’चा शुभारंभ
By admin | Published: January 23, 2016 2:10 AM