लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राज्य शासनाच्या वन व सामाजिक वनिकरण विभागाद्वारे महाराष्ट्रात चार कोटी रोपांची लागवड करण्याच्या महत्वाकांक्षी अभियानांतर्गत स्थानिक नंदोरी चौकात आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते वनमहोत्सव केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. येथूनच शहरात ‘रोपे आपल्या दारी’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे.यावेळी विभागीय वनाधिकारी दिगांबर पगार, नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, प्रा. किरण वैद्य, नगरसेवक प्रा. डॉ. उमेश तुळसकर यांची उपस्थिती होती. सदर वनमहोत्सव केंद्रांतर्गत शुक्रवारपर्यंत प्रत्येक नागरिकास पाच तर संस्थांना २५ रोपे याप्रमाणे स्टॉल वरून विक्री करण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर १ जुलै ते ७ जुलै दरम्यान वनविभागाच्यावतीने घरपोच रोपटी पोहचविली जाणार असल्याची माहिती विभागीय वनाधिकारी पगार यांनी दिली. नगराध्यक्ष बसंतानी यांनी हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षालागवत करण्यात येत असल्याचे सांगितले. आ. कुणावार यांनी भूगर्भातील जल पातळी वाढविण्याकरिता या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमात समुद्रपूरच्या नगराध्यक्ष शिला सोनारे, नगरसेवक वामन मावळे, दादा देशकरी, नरेश युवनाथे, अमोल खंदार, बंटी वाघमारे उपस्थित होते. संचालन वनाधिकारी धात्रक यांनी केले. आभार वनपरिक्षेत्र अधिकारी पवार यांनी मानले. कार्यक्रमाकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी बाभळे, वनक्षेत्रपाल अनिल देवतळे, बन्सोड, कापकर यांनी परिश्रम घेतले.
वनमहोत्सव केंद्रांतर्गत ‘रोपे आपल्या दारी’ योजनेचा शुभारंभ
By admin | Published: June 30, 2017 1:53 AM