लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जास्तीत जास्त गुण मिळविणे हा शिक्षणाचा उद्देश नसून ज्ञानार्जन करणे हा शिक्षणाचा खरा उद्देश आहे व ज्ञानार्जनाची जिद्द जोपासणाराच खरा विद्यार्थी असतो असे प्रतिपादन विद्याभारती संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.जी. भोयर यांनी केले. विद्याभारती महाविद्यालय सेलू येथील नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात ते बोलत होते.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. संजय एस. कानोडे, डॉ. भास्कर घैसास उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. भास्कर घैसास यांनी केले. कला, विज्ञान व वाणिज्य विभागात नवप्रवेशित विद्यार्थ्यांपैकी गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थ्यांचा पुरस्कार देवून स्वागत करण्यात आले. त्या अनुषंगाने विज्ञान विभागातून वैष्णवी श्रावण ठाकरे, कोमल संजय सयाम व जितेंद्र भगवान उईके, कला विभागातून विशाल गोपाल इखार, पूनम रघुनाथ जाधव व दुर्गेश तेलरांधे, वाणिज्य विभागातून गायत्री शिंदे, नम्रता नान्ने व आरती गजानन गव्हाळे यांचा तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शमीना सैय्यद, प्रणाली भट व संकेत देशमुख आदींचा समावेश होता. यानंतर क्रीडा विभाग प्रमुख डॉ. शशांक निकम यांनी क्रीडा विभागाची प्रा. किशोर डंभारे यांनी ग्रंथालय विभागाची, चिन्मयी पनके यांनी सांस्कृतिक विभागाची माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. अभिजीत पाटील यांनी केले तर आभार डॉ. विभा निकोसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. खुशाल पठाडे, डॉ. करूणा गणवीर, प्रा. वैभव पिंपळे, प्रा. आशिष शास्त्रकार, डॉ. शशांक निकम व प्रा. सोनल पंचभाई, देवेंद्र नाईक व मंगेश भोयर यांनी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करणे हाच शिक्षणाचा खरा उद्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:27 AM
जास्तीत जास्त गुण मिळविणे हा शिक्षणाचा उद्देश नसून ज्ञानार्जन करणे हा शिक्षणाचा खरा उद्देश आहे व ज्ञानार्जनाची जिद्द जोपासणाराच खरा विद्यार्थी असतो असे प्रतिपादन विद्याभारती संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.जी. भोयर यांनी केले.
ठळक मुद्देराजेश भोयर : नवप्रवेशित विद्यार्थी स्वागत समारंभ