शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

कुष्ठरोग जनजागृती मोहिमेचा समारोप

By admin | Published: February 14, 2017 1:28 AM

गांधी मेमोरियल लेप्रसी फाऊंडेशन वर्धा व नागरी आरोग्य केंद्र या संस्थेद्वारा राबविण्यात आलेल्या स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिमेचा समारोपिय कार्यक्रम ....

समाजातील समज-गैरसमजाविषयी केला ठिकठिकाणी जागरवर्धा : गांधी मेमोरियल लेप्रसी फाऊंडेशन वर्धा व नागरी आरोग्य केंद्र या संस्थेद्वारा राबविण्यात आलेल्या स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिमेचा समारोपिय कार्यक्रम सोमवारी सिंदी (मेघे)च्या सरपंच सुप्रिया मोहोड यांच्या अध्यक्षतेत पार पडला.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रंजन सोलंकी, वर्षा पुराणिक, रमाबाई कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. पिंपळे, सहसंचालक प्रमोद बहुलेकर, राजेंद्र डोळे, खेडकर यांच्यासह गांधी मेमोरियल लेप्रसी फाउंडेशन व विहान प्रकल्पाचे कार्यकत्यांची यावेळी उपस्थिती होती.मार्गदर्शन करताना प्रमोद बहुलेकर यांनी कुष्ठरोग पीडितांशी भेदभाव न करता त्यांना समाजात सन्मानाने जगू दिले पाहिजे असे सांगितले. कुष्ठरोग कसा होतो. तो कसा पसरतो. त्यावरील उपचार व या आजाराविषयी समाजात असणारे गैरसमज यासंबंधीही त्यांनी यावेळी माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान कुष्ठरोगा विषयी माहिती देणारी चित्र प्रदर्शनिही लावण्यात आली होती. या कुष्ठरोग पंधरवड्यात गांधी मेमोरियल लेप्रसी फाऊंडेशनतर्फे वर्धा बस स्थानक, आंजी (मोठी) येथील बाजारात कुष्ठरोगावर आधारित प्रदर्शनी लावून जनजागृती करण्यात आली. सदर उपक्रमादरम्यान तीन शहरी व दोन ग्रामीण क्षेत्रात ‘कुष्ठरोग’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. विविध सहा शाळेमधील विद्यार्थ्यांची तपासणी करुन विद्यार्थी-विद्यार्थिनींना कुष्ठरोगाविषयी माहिती देण्यात आली. चार ग्रामसभेत तसेच सात विशेष सभेत महिलांना कुष्ठरोगा संबंधी माहिती देत जनजागृती करण्यात आली. या विशेष उपक्रमाला सविता वैद्य, गजानन कुराडकर, डॉ. माखिजा, अलका खेडकर, अश्विनी तिमांडे, विद्या सिस्टर, जाहागीर पठाण, तृप्ती थुल, अविनाश व कल्पना काळे, प्रभाकर डोरले आदींचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन कल्पना काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गजानन कुराडकर यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शहनाज पठाण, राजेंद्र डोळे, संजय चोरटकर आदींनी सहकार्य केले. या कार्यक्रमातून कुष्ठरोगा विषयी जनजागृती करण्यात आली.(शहर प्रतिनिधी)