लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना नेहमीच्या कामातून मोकळीकता मिळावी व त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावी म्हणून तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवादरम्यान मैदानावर सुविधांचा अभाव असल्यामुळे पहिल्याच दिवशी खेळताना गंभीररित्या जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला ऑटोतून रुग्णालयात न्यावे लागले. याबाबत आयोजन समितीतील अधिकारी व कर्मचारी अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.जिल्ह्यातील आठही पंचायत समितीमधील कर्मचारी जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात सहभागी झाले आहे. गुरुवापासून सुरू झालेल्या या तीन दिवसीय महोत्सवावर लाखो रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या महोत्सवाची जबाबदारी असणाऱ्यांनी मैदानावर विविध सुविधा पुरविणे अपेक्षीत आहे. आरोग्य विभागाची चमू व रुग्णवाहिका असणेही अनिवार्य आहे पण; या सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आले. आज सकाळी कबड्डीचा सामना सुरु असताना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात लिपिक पदावर कार्यरत असलेले निलेश चव्हाण यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.त्यांना रुग्णालयात नेण्याकरिता कोणतीही सुविधा नसल्याने मैदानावरील काही कर्मचाऱ्यांनी ऑटोच्या सहाय्याने शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेबाबत आयोजकांना काहीच माहिती नव्हती. सायंकाळपर्यंत कोणीही रुग्णालयात येऊन साधी विचारपुसही केली नसल्याचे सांगण्यात आले. गेल्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवातही देवळी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे उपचाराचा सर्व खर्च त्याच कर्मचाऱ्याला करावा लागला.जर क्रीडा महोत्सवात मैदानावर खेळणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य सुविधा मिळत नसेल तर या महोत्सवाच्या आयोजनाचा फायदा तरी काय? असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.विद्यार्थी असो वा कर्मचारी क्रीडा महोत्सवाकरिता निधीची तरतूद सारखीच!जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठीही तीन दिवसांचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित केल्या जातो. या महोत्सवात हजारावर विद्यार्थी सहभागी होतात. याकरिता जिल्हा परिषदेकडून दहा लाखांचा निधी दिला जातो. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या दानशे ते तिनशे कर्मचाºयांसाठीच दहा लाखांचा खर्च केला जातो. त्यामुळे जिल्हा परिषदेला विद्यार्थ्यांच्या भवितव्यापेक्षा कर्मचाऱ्यांचे महत्त्व जास्त असल्याचे बोलले जात आहेकर्मचारी व अधिकारी या महोत्सवाकरिता तालुकास्तरावर स्पर्धेच्या पूर्वी आठ ते पंधरा दिवसांपासून सराव करतात. या सरावाच्या नावावर काही कर्मचारी कार्यालयाला दांडी मारतात. तर काही कर्मचारी स्पर्धेच्या निमित्ताने वर्ध्यात येऊन केवळ मनोरंजन करतात. यावर्षीपासून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याला आळा घालण्याकरिता दोन वेळा हजेरी सुरू केली आहे. तरीही काही कर्मचारी मैदानाऐवजी शहरात इकडे-तिकडे फिरताना दिसून आले.क्रीडाप्रेमी रमले विविध खेळांतखेळामध्ये आवड असणारे अधिकारी व कर्मचारी आज सकाळपासून मैदानावर खेळात रमले होते. यामध्ये क्रिकेट, कबड्डी व व्हॉलीबॉलचे पंचायत समितीनिहाय सामने घेण्यात आले. या स्पर्धेत महिला कर्मचाऱ्यांचीही संख्या बरीच होती. काही महिला कर्मचारी आपल्या चिमुकल्यासह मैदानावर उपस्थित झाल्या होत्या. सामना संपल्यानंतर काहींनी सामना सुरु होण्यापूर्वी आपल्या तान्हुल्यांसाठी झोपाळा तयार करून त्यात त्याला जोजवित होते.
मैदानावर सुविधांची वानवा खेळाडू कर्मचाऱ्याला दुखापत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 6:00 AM
जिल्ह्यातील आठही पंचायत समितीमधील कर्मचारी जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात सहभागी झाले आहे. गुरुवापासून सुरू झालेल्या या तीन दिवसीय महोत्सवावर लाखो रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या महोत्सवाची जबाबदारी असणाºयांनी मैदानावर विविध सुविधा पुरविणे अपेक्षीत आहे. आरोग्य विभागाची चमू व रुग्णवाहिका असणेही अनिवार्य आहे पण; या सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आले.
ठळक मुद्देजिल्हा परिषद क्रीडा महोत्सव : तीन दिवसांच्या आयोजनावर लाखोंचा खर्च