पथकाचा उपक्रम : सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमवर्धा : सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग प्रशिक्षण पथक वर्धाच्यावतीने गुरूवारी क्षयरुग्णांना नवीन उपचार पद्धती सुरू करण्याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यात शहरातील फार्मासिस्ट, केमिस्ट व ड्रगिस्ट यांना क्षयरोगाच्या नवीन उपचार पद्धतीबाबत धडे देण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी तर अतिथी म्हणून औषधी निरीक्षक शहनाझ ताजी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले, केमिस्ट व ड्रगिस्ट असो.चे वर्धा तालुकाध्यक्ष विशाल पोखरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवतकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. स्वाती पाटील (सरोदे) उपस्थित होते.सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातील महत्त्वपूर्ण बदल म्हणून क्षयरुग्णांना आता त्याच्या वजनावर आधारित दररोज उपचार पद्धती देण्यात येत आहे. याचा फायदा क्षयरुग्णांना देण्यात यावा. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचे उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांची माहिती शासनाला मिळावी म्हणून खासगी केमिस्ट व ड्रगिस्ट यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन असल्याचे डॉ. मडावी यांनी सांगितले. शहनाझ ताजी यांनी अधिकाधिक केमिस्ट व ड्रगिस्ट यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन दररोज उपचार पद्धतीचे औषध क्षयरुग्णांना पोहोचविण्याचे आवाहन केले.शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिक क्षेत्रात एकूण क्षयरुग्णांच्या ५० टक्के रुग्ण शासकीय यंत्रणेत येतात तर ५० टक्के क्षयरुग्ण खासगी वैद्यकीय व्यावसायिक क्षेत्रात जातात. त्यांची माहिती नोटिफिकेशनसाठी मिळावी म्हणून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहे. तरी क्षयरुग्णांची संपूर्ण माहिती शासनाला मिळत नाही. यामुळे जिल्ह्याचा नोटिफिकेशन रेट कमी आहे. तो वाढविण्याच्या दृष्टीकोणातून शहरातील केमिस्ट व ड्रगिस्ट यांचा सहभाग वाढला पाहिजे, असे आवाहन डॉ. चव्हाण, डॉ. डवले, डॉ. पाटील (सरोदे) यांनी केले. दररोज उपचार प्रणालीच्या जिल्ह्यातील यंत्रणेबाबत माहिती देऊन रुग्णांना वेळीच निदान व औषधोपचार कशा पद्धतीने करण्यात येईल, याबाबत डॉ. डवले यांनी माहिती दिली. औषधी प्रणालीचे प्रशिक्षण औषधी निर्माण अधिकारी उज्वल वासनिक यांनी घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्वाती पाटील यांनी केले. संचालन संजीव शेळके यांनी केले तर उपस्थितांचे आभार वानखडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता विशाल पोखरे, जितेंद्र वाखडे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. प्रशिक्षण कार्यक्रमात अमित दुबे, मनोज वरभे, सोनटक्के, राठोड यांच्यासह शहरातील सर्व केमिस्ट व ड्रगिस्ट सहभागी झाले.(कार्यालय प्रतिनिधी)समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न गरजेचेक्षयरोगाबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्याकरिता आरोग्य विभाग विविध उपचार पद्धतींद्वारे प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना खासगी वैद्यकीय व्यावसायिक तथा केमिस्ट, ड्रगिस्ट व फार्मासिस्टने सहकार्य कणे गरजेचे आहे. शासनामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, मोफत निदान व औषधोपचारांबाबत यावेळी माहिती देण्यात आली.
प्रशिक्षणातून दिले क्षयरोग उपचार पद्धतीचे धडे
By admin | Published: March 07, 2017 1:15 AM