लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आजच्या परिस्थितीत चालती बोलती ग्रंथालये कशी करता येईल, त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. एकसंध राष्ट्र म्हणून जात, धर्म बाजूला ठेवून एकत्रित आले पाहिजे. जनमानसातील ग्रंथालय हा अविभाज्य घटक असल्याचे मत माजी राज्यसभा सदस्य तथा मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.प्रियदर्शनी महिला महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्यावतीने पाच दिवसीय वेबिनार ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अॅण्ड फ्युचर लॉयब्रियनशीप’ यावर आयोजित करण्यात आलेला आहे. याचे सोमवारी ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.प्रा. अमृत देशमुख यांनी मेक इंडिया रिड बुकलेट यावर मार्गदर्शन करताना वाचावे कसे, काय वाचावे, गती काय असावी असे सांगत १३५० पुस्तके वाचल्याचे सांगितले. हातात पुस्तक घेणे म्हणजे वाचन नव्हे. माध्यमाला नाही तर मजकुराला महत्त्व द्या. वाचनाची गती प्रतिमिनीट १२०० शब्द असे म्हणाले.वाचन करताना विचार करू नये, असे सांगत मेक इन इंडिया बिझनेस नाही तर मिशन असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रंभा सोनाये होत्या. आयोजन डॉ. प्रतिभा ताकसांडे यांनी केले. विदर्भातील हा पहिला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा प्रयोग ठरला. आभार प्रदर्शन प्रा.डॉ. धनंजय सोनटक्के यांनी केले. राज्यातील १०१ ग्रंथपाल आणि प्राध्यापकांनी यात सहभाग नोंदविला आहे.
ग्रंथालय जनमानसातला महत्त्वाचा घटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 5:00 AM
प्रियदर्शनी महिला महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्यावतीने पाच दिवसीय वेबिनार ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अॅण्ड फ्युचर लॉयब्रियनशीप’ यावर आयोजित करण्यात आलेला आहे. याचे सोमवारी ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रा. अमृत देशमुख यांनी मेक इंडिया रिड बुकलेट यावर मार्गदर्शन करताना वाचावे कसे, काय वाचावे, गती काय असावी असे सांगत १३५० पुस्तके वाचल्याचे सांगितले.
ठळक मुद्देभालचंद्र मुणगेकर : प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयात वेबिनार