लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आईला जाळल्या प्रकरणात मुलाला दंडासह जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल तदर्थ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. जी. सातपुते यांनी दिला. श्रीधर पुंडलीक गडलिंग (४२), रा. बोथली किन्हाळा ता. आर्वी, ह.मु. नेरी पूनर्वसन सालोड असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे.सविस्तर वृत्त असे की, मृतक छबुताई गडलिंग व वडील पुंडलीक गडलिंग यांचे नेरी ता. आर्वी येथे घर व शेती होती. सदर शेती व घर हे शासनाने सरकारी धरणाच्या योजनेंतर्गत घेतली. तसेच त्या गावातील इतरांची सुद्धा व घर या अंतर्गत घेतले व त्यांना नेरी पूनर्वसन सालोड येथे प्रत्येकी ४ हजार चौरस फुटाचे प्लॉट दिले. मृतक छबुताई व आरोपीचे वडील यांनी त्या जागेवर २००७ मध्ये घर बांधुन राहत होते. आरोपी हा त्यााच्या मुलाबाळा सोबत वेगळा बोथली किन्हाळा ता. आर्वी येथे राहत होता. तो अधुन-मधुन आई व वडील यांना भेटण्यासाठी येत होता. २५ ऑगस्ट २०१७ ला आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला. त्यावेळी छबुताई घरी एकटी होती. आरोपीने मृतक छबुताई हिला पैशाची मागणी केली. तिने देण्यास नकार दिला. तर आरोपीने कोंबड्या विकतो म्हणून पिशवीत घेतल्या. परंतु मृतक छबुताई हिने पुन्हा विरोध दर्शविला. त्यानंतर आरोपीने छबुताई हिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला आगीच्या हवाले केले. यात गंभीर जखमी झालेल्या छबुताईचा मृत्यूपूर्व बयाण पोलिसांनी व तहसीलदारांनी नोंदविला.त्यानंतर सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी विश्वेश्वर गडलिंग त्याची साक्ष महत्वाची ठरली. तसेच आरोपी याचे कपड्यावर रॉकेल तेल रासायनिक विश्लेषन अहवालामध्ये मिळून आले. या प्रकरणाचा संपूर्ण तपास पुर्ण करून पोलीस उपनिरीक्षक किशोर साखरे यांनी प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात मृतक छबुताई हिचे मृत्यूपर्व बयाण प्रत्यक्षदर्शी साक्षदार व रासायनिक विश्लेषण अहवाल ग्राह्य धरण्यात आला. सहा. शासकीय अभियोक्ता अॅड. विनय घुडे यांनी सदर प्रकरणात पुरावे घेवून युक्तीवाद केला. साक्षदारांना हजर करण्यासाठी पोलीस कर्मचारी भारती कारंडे यांनी कामगीरी बजावली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद आणि पुराव्याच्या आधारे न्यायाधीशांनी आरोपीला भादंविच्या कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा तसेच रुपये १ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
आईला जाळणाऱ्या मुलाला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 6:00 AM
२५ ऑगस्ट २०१७ ला आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला. त्यावेळी छबुताई घरी एकटी होती. आरोपीने मृतक छबुताई हिला पैशाची मागणी केली. तिने देण्यास नकार दिला. तर आरोपीने कोंबड्या विकतो म्हणून पिशवीत घेतल्या. परंतु मृतक छबुताई हिने पुन्हा विरोध दर्शविला. त्यानंतर आरोपीने छबुताई हिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला आगीच्या हवाले केले.
ठळक मुद्देदंडही ठोठावला : जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल