शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

तीन वर्षांत ५६ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 11:10 PM

शेतकरी आत्महत्यांनी अख्खा जिल्हा ढवळून निघत आहे. विविध उपाययोजना केल्यानंतरही तालुक्यात जानेवारी २०१५ ते २२ सप्टेंबर २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण ५६ शेतकऱ्यांनी मृत्यू जवळ केला आहे.

ठळक मुद्दे ३८ आत्महत्या ठरल्या पात्र : १९ कुटुंबीयांना नाकारली मदत

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शेतकरी आत्महत्यांनी अख्खा जिल्हा ढवळून निघत आहे. विविध उपाययोजना केल्यानंतरही तालुक्यात जानेवारी २०१५ ते २२ सप्टेंबर २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण ५६ शेतकऱ्यांनी मृत्यू जवळ केला आहे. आर्थिक संकटाला कंटाळून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद महसूल विभागाने घेतली आहे.सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून २६ जानेवारी २०१५ या वर्षात तालुक्यात २२ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. यापैकी पाच आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्यात. या आत्महत्या वडगाव, राजणी, आर्वी, सोरटा, चोरांबा, टाकरखेडा, सालफळ, सालधरा, मोरांगणा, पाचोड (ठाकूर), वाढोणा, मांडला, धनोडी, वाढोणा, चिंचोली (डांगे), विरूळ (आ.), धनोडी, टोणा या गावांतील आहेत.२०१६ मध्ये २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात १४ शेतकरी आत्महत्या पात्र ठरविल्या असून सहा आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या. सर्कसपूर, सावळापूर, हैबतपूर, बेल्हारा, विरुळ, पाचेगाव, नांदपूर, खुबगाव, पिंपळगाव, जळगाव, टाकळी, आर्वी, बेल्हारा, रसुलाबाद, वर्धमनेरी, धनोडी, निंबोली (शेंडे), चिंचोली (डांगे), मदना आदी गावांतील ते शेतकरी होते.२०१७ मध्ये १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात ७ आत्महत्या पात्र ठरल्या तर ८ आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या. दोन प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत. या शेतकरी आत्हत्या सोनेगाव, कर्माबाद, सोरटा, पिंपळा, आर्वी, पाचोड, सावरखेडा, आर्वी, बोथली (कि़), पाचोड, धनोडी, हुसेनपूर, रोहणा, डबलीपूर, लाडेगाव, अहिरवाडा या गावांत झाल्यात.तालुक्यात तीन वर्षांत ५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या .आर्थिक विंवचनेतून झाल्या असताना १९ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. बहुतांश आत्महत्या विष प्राशन करून करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आलेले आहे. शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे कृषी धोरणाकडे गांभीर्याने पाहण गरजेचे झाले आहे. शासन, प्रशासन मात्र याबाबत गंभीर नसल्याचेच चित्र पाहावयास मिळत आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या