शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शेतीवाहीसाठी डोंग्यातून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 5:00 AM

वीस वर्षांपूर्वी वाहितपूर-मोर्चापूर येथील नागरिक पवनार येथे बाजारहाट करण्याकरिता येत असत. वर्ध्याला जायचे असेल तर पवनारपर्यंत पायी किंवा सायकलने येऊन मग तेथून एस.टी. किंवा इतर वाहनाने वर्ध्याला जायचे. मात्र, वर्धा एमआयडीसीला पाणीपुरवठा करण्यासाठी बंधारा बांधला गेला व परिस्थिती बदलली. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीतून आवागमनाचा मार्ग बंद झाला.

ठळक मुद्देपवनारातील वास्तव : जिल्हा प्रशासनाचा समस्येकडे कानाडोळा

श्रीकांत तोटे ।लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : तीनशे मीटर नदीपात्र ओलांडून शेतीवाहीसाठी येथील शेतकऱ्यांचा कित्येक वर्षांपासून जीवघेणा प्रवास सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नसून अनास्था कायम आहे.वीस वर्षांपूर्वी वाहितपूर-मोर्चापूर येथील नागरिक पवनार येथे बाजारहाट करण्याकरिता येत असत. वर्ध्याला जायचे असेल तर पवनारपर्यंत पायी किंवा सायकलने येऊन मग तेथून एस.टी. किंवा इतर वाहनाने वर्ध्याला जायचे. मात्र, वर्धा एमआयडीसीला पाणीपुरवठा करण्यासाठी बंधारा बांधला गेला व परिस्थिती बदलली. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीतून आवागमनाचा मार्ग बंद झाला. पवनारला येण्यास कान्हापूरमार्गे तीन किलोमीटरचा फेरा वाढल्याने त्यांनी सेलू येथे जाणे पसंत केले. मात्र, पवनार येथील अनेक शेतकऱ्यांची शेती नदीच्या पैलतीरावर आहे. त्यांना शेतीवर जाण्यासाठी नदी ही ओलांडावीच लागते, शेतमाल, शेतमजूर यांचीसुद्धा ने-आण करावी लागते. एम.आय.डी.सीच्या बंधाºयावरून छोटा पूल आहे. मात्र, त्या पुलावरून गेल्यास तीन-चार किलोमीटरचा फेरा पडतो. यात बराच वेळ खर्ची होत असल्याने या तिरावरून त्या तिरावर जाण्यासाठी डोंग्याचा वापर केला जातो. साधारण ३०० मीटर नदीपात्र हे त्या डोंग्यातून पार केले जाते. ज्या मार्गाने डोंगा जातो, तेथे कमीत कमी पंधरा फूट पाण्याची पातळी असते. सकाळच्या वेळेस शेतात जाण्याची शेतमालकासह शेतमजुरांची लगबग असते. त्यामुळे क्षतमेपेक्षा जास्त प्रवासी नावाड्याने मनाई केल्यावर सुद्धा बसतात. प्रवास करणाऱ्यांसाठी कुठल्याही लाईफ जॅकेट्सची व्यवस्था नसते. पाणी अडविल्यामुळे नदीची पातळी वर्षभर कायम असते, त्यामुळे नेहमीकरीताच डोंग्याचा वापर केला जातो. त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. जो डोंगा हाकलतो, तो नाममात्र शुल्क घेत असल्याने सोयी-सुविधा देऊ शकत नाही. सोयी द्यायच्या म्हटले तर आकारलेले जास्तीचे शुल्क शेतमालक किंवा शेतमजुराला परवडणारे नाही. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.पुलाची निर्मिती कासवगतीनेही अडचण दूर व्हावी म्हणून अनेक वर्षापासून असलेली पुलाची मागणी आमदार पंकज भोयर यांच्या प्रयत्नातून तत्कालीन सरकारने मंजूर केली. दोन वर्षांपासून या पुलाचे काम कासवगतीने सुरू आहे. हीच गती कायम राहिल्यास अजून दोन वर्षे पुलाचे काम पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाही. पुलाचे काम लवकर करावे किंवा डोंग्याने जाण्यासाठी सोयी-सुविधा द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीfloodपूर