लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोराड येथे मंगळवारी रात्री १२ वाजता त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त लाखो वातींचा त्रिपुर लावला जाणार आहे.गेल्या पावणेदोनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या मंदिरात नवीन निघणाºया कापसाच्या वातींपासून त्रिपूर जाळला जातो. घरोघरी बनवलेल्या या लाखो वाती मंदिरात एकत्र आणल्या जातात. तुपात भिजवलेल्या या वातींचे पूजन केले जाते. संत केजाजी महाराज व संत नामदेव महाराजांची परंपरा राखणारे अनेक भाविक रात्रीचा हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.कोजागिरी पोर्णिमा ते त्रिपुरारी पोर्णिमा या कालावधीत काकड आरती, आवळीपूजन, वनभोजन आदी कार्यक्रम घेतले जातात. टाळमृदंगाच्या निनादात भजनी मंडळींची दिंडी रात्री १२ वाजता विठ्ठल रखुमाई मंदिरातून निघेल. ही दिंडी मंदिराच्या परकोटाला बोर नदीच्या तीरावर प्रदक्षिणा घालेले. या परकोटात विठ्ठ रखुमाई व महादेवाचे मंदिर आहे. या दोन्ही मंदिरांच्या कळसांवर मंगळवारी मध्यरात्री त्रिपूर लावला जाईल. कार्तिक मासाची सांगता मंदिरात शुक्रवारी काला दहीहंडीने केली जाणार आहे.भाविकांच्या मनात खंतयंदा परतीच्या पावसाने कापसाचे पीक उध्वस्त केल्याने, वातींसाठी नव्या कापसाची चणचण भासणार आहे. जुन्याच कापसाच्या वाती तयार कराव्या लागणार याची भाविकांना खंत वाटत आहे.
त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त वर्धा जिल्ह्यातील घोराड येथे लाखो वातींचा जळणार त्रिपूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 10:49 AM
विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोराड येथे मंगळवारी रात्री १२ वाजता त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त लाखो वातींचा त्रिपुर लावला जाणार आहे.
ठळक मुद्देमंदिराला पावणे दोनशे वर्षांची परंपरा