शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

केंद्र चालकांसह शेतकºयांनाही ‘लिंक फेल’चा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 12:40 AM

स्थानिक ग्रामदूत केंद्रामध्ये कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी शेतकºयांची गर्दी होत आहे; पण लिंक फेल होत असल्याने केंद्र चालकांना .......

ठळक मुद्देदिवसभर होते ताटकळ : ‘थम्ब मशीन’ची कमतरता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/सेवाग्राम : स्थानिक ग्रामदूत केंद्रामध्ये कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी शेतकºयांची गर्दी होत आहे; पण लिंक फेल होत असल्याने केंद्र चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय शेतकºयांनाही लिंक फेलचा फटका बसत असून दिवसभर वृद्ध दाम्पत्यांना ताटकळत बसावे लागत आहे. याकडे लक्ष देत तंत्रज्ञान गतिमान करणे गरजेचे झाले आहे.सेवाग्राम आश्रम मार्गावर ग्रामदूत केंद्र व तलाठी कार्यालय आहे. राज्य शासनाने शेतकºयांच्या कर्जमाफीची घोषणा करून आॅनलाईन आपली माहिती देण्याच्या सूचना दिल्यात. १५ सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीसाठी माहिती भरावयाची आहे. यामुळे शेतकरी आपली सर्व कामे बाजूला ठेवून पत्नीसह केंद्रात ठाण मांडत असल्याचे दिसते. पंचक्रोशीतील सर्व शेतकरी याच केंद्रावर येत असल्याने कामाचा ताण वाढला आहे. ग्रामदूत केंद्रात तीन संगणक परिचालक एकाच वेळी काम करीत असले तरी ‘थम्ब मशीन’ एकच असल्याने कामाची गती मंदावली आहे. यातच संपूर्ण राज्यात काम सुरू असल्याने ‘लिंक फेल’चा फटका बसत आहे. मागील चार दिवस लिंकच नव्हती, अशी माहिती देण्यात आली आहे. शनिवारी सुटी असताना शेतकºयांसाठी ग्रामदूत केंद्र सुरू करण्यात आले होते. यात २०० ते २५० शेतकºयांची नोंदणी व अर्ज भरण्याचे काम झाले. सुविधा व्हावी म्हणून शेतकºयांना टोकण देणे सुरू केले आहे. यामुळे शेतकºयांचा वेळ वाचणार आहे. शासनाने ‘थम्ब मशीन’ वितरित केल्या; पण या केंद्राला अद्याप अतिरिक्त मशीन मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. मुदतीच्या आत अर्ज भरण्याची घाई सर्वांनाच झाल्याने गोंधळाचे चित्र आहे.‘नेटवर्क’मध्ये अडथळ्यांची शर्यतडिजिटल प्रशासनाचा राज्यभरात गवगवा केला जात असला तरी यंत्रणा किती मजबूत आहे, हे कुणीही तपासताना दिसत नाही. सर्व बाबी आॅनलाईन केल्याचा गाजावाजा शासन, प्रशासनाकडून केला जातो; पण त्यासाठी लागणारे ‘नेटवर्क’ किती ‘स्ट्राँग’ आहे, हे तपासले जात नाही. परिणामी, ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’ या म्हणीप्रमाणे सर्वांची स्थिती होत आहे. सध्या कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरत असताना लिंक फेलचा मोठा फटका बसत असल्याचे दिसते. हा प्रकार एकाच गावात नाही तर सबंध जिल्हाभर केंद्र संचालक, तेथील कर्मचारी तथा शेतकºयांना सहन करावा लागत आहे.एकाच दिवसात काम होईल, याचीही शाश्वती राहत नसल्याने शेतकºयांना तीन ते चार दिवस चकरा माराव्या लागत आहे. कुठे लिंक आहे तर शेतकºयांच्या बोटांचे ठसे येत नाही, कुठे सर्व व्यवस्थित आहे तर आधार कार्ड इनव्हॅलीड दाखवित आहे, असे अनेक अडथळे येत असल्याने कर्जमाफीच्या आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया मंदावत असल्याचे दिसते. यासाठी नेटवर्क स्ट्राँग करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.