शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

बीएसएनएलला पालिकेचे कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:40 PM

सिव्हील लाईन भागातील बीएसएनएलच्या कार्यालयाला मंगळवारी न.प.च्या अधिकाऱ्यांनी सील ठोकले. मालमत्ता कर थकविल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे मालमत्ता कर थकविला : पथक पोहोचताच उडाली तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सिव्हील लाईन भागातील बीएसएनएलच्या कार्यालयाला मंगळवारी न.प.च्या अधिकाऱ्यांनी सील ठोकले. मालमत्ता कर थकविल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. पालिकेचे कर वसूली पथक सदर कार्यालय परिसरात पोहोचल्याची माहिती होताच बीएसएनएलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती.बीएसएनएलच्या अधिनस्त असलेल्या सिव्हील लाईन भागातील तीन इमारतींचा अतिरिक्त दंडासह ६४ लाख २३ हजार ९८४ रुपयांचा कर थकला होता. हा कर भरण्याकडे सदर कार्यालयाचे दुर्लक्ष झाले. या कराचा भरणा करण्यासंदर्भात वारंवार नोटीस बजावूनही काहीच कारवाई झाली नाही. यामुळे आज पालिकेच्या करपथकाने दुपारी बीएसएनएल कार्यालय गाठले. यावेळी बीएसएनएलच्या अधिकाºयांना सुचना देऊनही मालमत्ता कर भरण्याकडे होत असलेली टाळाटाळ लक्षात घेता पथकातील थेट बीएसएनएलच्या कार्यालयालाच सील ठोकण्याचा निर्णय घेतला. याची माहिती बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना देताच त्यांची एकच तारांबळ उडाली होती. बराच वेळ न.प. अधिकारी व बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होऊनही थकीत मालमत्ता कर भरण्याबाबत योग्य निर्णय झाला नाही. अखेर कार्यालयाला सील ठोकले.यावेळी ज्या इमारतीतून जिल्ह्यातील नागरिकांना बीएसएनएल इंटरनेटची सुविधा पुरविते त्या इमारतीला सोडून कार्यालयाला सील ठोकण्यात आले. ही कारवाई न.प.चे प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर, कर विभाग प्रमुख रवींद्र जगताप, अशोक ठाकूर, विशाल सोमवंशी, चंदन महत्वाने, प्रदीप मुळघाटे, नाना परटक्के, प्रवीण बोबडे, खुशाल तामगाडगे, राजेंद्र शंभरकर, जगदीश गौतम आदींनी केली.तिसऱ्यांदा सील ठोकण्याची नामुष्कीसिव्हील लाईन भागातील बीएसएनएलच्या कार्यालयाला न.प. अधिकाऱ्यांनी २००४ व २०१७ मध्ये मालमत्ता कराचा भरणा न केल्याने सील ठोकले होते. त्यानंतर झालेल्या तडजोडीअंती सील काढण्यात आले होते. यंदाही मालमत्ता कराची रक्कम अदा न केल्याने तिसऱ्यांदा वर्धा न.प.च्या अधिकाऱ्यांनी बीएसएनएल कार्यालयाला पालिकेचे कुलूप लावले.कार्यालयातील साहित्य बाहेर काढण्यासाठी धावाधावपालिकेचे अधिकारी सील ठोकत असल्याचे कळताच बीएसएनएलच्या कर्मचाºयांची एकच तारांबळ उडाली. वेळ मिळताच कार्यालयातील साहित्य बीएसएनएलच्या बाहेर काढून इतर ठिकाणी ठेवले.

टॅग्स :BSNLबीएसएनएल