लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाचा इयत्ता दहावीचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालाची जिल्ह्यातील सुमारे १४ शाळेतील विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. बहुप्रतिक्षीत निकालात भूगाव येथील लॉयड्स भवन्स विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारल्याचे दिसून आले आहे. या शाळेतील साक्षी झुनझुनवाला ही ९७.६० टक्के गुण घेवून जिल्ह्यातून प्रथम आली आहे. तर याच शाळेतील उर्वी सिन्हल ९७.२० टक्के गुण घेवून जिल्ह्यातून दुसरी ठरली. तर वर्धेतील गांधी सिटी पब्लीक स्कूलचा विद्यार्थी रिशी आसोफा याला ९७.२० टक्के गुण मिळाले. तो जिल्ह्यातून दुसरा व मुलांमधून पहिला ठरला.अग्रगामी स्कूल म्हसाळा येथील जान्हवी अढावू ही ९७ टक्के गुण घेतले. ती जिल्ह्यातून तिसरी ठरली. एकंदरीत सीबीएसईच्या निकालात जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून आले. हिंगणघाट येथील गिरधरदास मोहता विद्या मंदिर येथील हर्ष ओस्तवाल हा जिल्ह्यात मुलांमधून दुसरा ठरला. त्याला ९६.६० टक्के गुण मिळाले आहे. तर सेलूकाटे येथील नवोदय विद्यालयाचा अथर्व भोमले व संकेत बहाद्दुरे या दोघांनी ९६ टक्के गुण घेवून जिल्ह्यात मुलांमधून तिसरा येण्याचा मान पटकाविला आहे. सीबीएसई या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना निकाल सीजीपीए प्रणालीने लागत असल्याने त्यांची टक्केवारी काढणे कठीण जात असल्याचे दिसून आले आहे. पूर्वी निकाल शोधताना शाळेच्या नावावरच निकाल निघत होता. तर आता प्रत्येक विद्यार्थ्यांचा निकाल शोधावा लागल्याने शाळा प्रशासनाची चांगलीच कसरत झाल्याचे दिसून आले.सीबीएसईचा निकाल दुपारी ४ वाजता जाहीर होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र दिलेल्या संकेतस्थळावर यापूर्वीच निकाल जाहीर झाला होता.जिल्ह्यात लॉयड्स भवन, रमाबाई देशमुख पब्लीक स्कूल, जवाहर नवोदय विद्यालय, स्कूल आॅफ स्कॉलर, अल्फोन्सा, स्वामी विवेकानंद, अग्रामागी म्हसाळा, गांधीसीटी पब्लीक स्कूल, चन्नावार ई लर्निंग स्कूल, माऊंट कारमेल, सेंट जॉन, हिंगणघाट, भारती विद्याभवन हिंगणघाट, केव्हीएस पुलगाव, न्यू इंग्लिश अॅकेडमी व गांधी सीटी पुलगाव या शाळांतून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या सर्वच शाळेने उत्कृष्ट निकाल दिल्याचे दिसत आहे.साक्षीला व्हायचेय डॉक्टर९७.६ टक्के गुण घेवून जिल्ह्यात प्रथम येणाऱ्या साक्षीला डॉक्टर व्हायचे आहे. आपण नियमित दोन तास खंड न पडता अभ्यास करीत होतो. केवळ गणित व विज्ञान या विषयाची शिकवणी आपण लावली होती. २००३ मध्ये मोठ्या बहिणीनेही ९७.६ टक्के गुण मिळविले होते; पण ती द्वितीय क्रमांकावर राहिली. साक्षीच्या कुटुंबात एकूण पाच जण असून आई गृहिणी तर वडिलांचे इलेक्ट्रॉनिक्स व हार्डवेअरचे दुकान आहे.
लॉयड्सची साक्षी झुनझुनवाला अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:03 PM
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाचा इयत्ता दहावीचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालाची जिल्ह्यातील सुमारे १४ शाळेतील विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. बहुप्रतिक्षीत निकालात भूगाव येथील लॉयड्स भवन्स विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारल्याचे दिसून आले आहे.
ठळक मुद्देसीबीएसईत मुलींचीच बाजी : गांधी सिटीचा रिशी आसोफा मुलांमधून प्रथम