शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

भरधाव ट्रक पडला कालव्यात; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:43 PM

नागपूरवरुन जामकडे सेंटिगचे पाईप घेऊन जात असलेल्या भरधाव ट्रक अनियंत्रित होत कालव्यात पडला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना तालुक्यातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ७ वरील आजदा शिवारात घडली.

ठळक मुद्देएक गंभीर : आजदा शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूरवरुन जामकडे सेंटिगचे पाईप घेऊन जात असलेल्या भरधाव ट्रक अनियंत्रित होत कालव्यात पडला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना तालुक्यातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ७ वरील आजदा शिवारात घडली. चालकाला झोपेची डुलकी आल्याने हा अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळी होती.भरधाव ट्रक अनियंत्रित होत आजदा शिवारातील कॅनलच्या पुलावर जाऊन धडकला. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना बघता-बघता ट्रक कॅनलमध्ये पडला. या भीषण अपघातात क्लिनरच्या अंगावर ट्रक मधील पाईप पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी झाला. एहसान खान अयुब खान (२८) रा. पलवल मेवाद (हरियाणा) असे मृतकाचे तर नशिब खान अब्बास खान (२२) रा. मटेपुल पलवल (हरियाणा) असे गंभीर जखमीचे नाव आहे. मंगळवारी पहाटे नागपूरवरून सेंटिंगचे पाईप घेऊन हा ट्रक जामकडे येत असलेल्या ट्रक चालक नशीब खान अब्बास खान यास झोपेची डुलकी आली.अशातच त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दरम्यान ट्रकने कॅनलच्या पुलाला धडक दिली. दरम्यान ट्रक २० फुट खोल कॅनल मध्ये पडला. अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, चंदू बन्सोड, बंडु डडमल, शंकर भोयर, सचिन गाढवे, दिलिप वांदिले, दीपक जाधव, प्रविण बागडे यांनी घटनास्थळ गाठून मृतदेत ताब्यात घेतला. तसेच जखमीला तातडीने रुग्णालयाकडे रवाना केले. घटनेची माहिती समुद्रपूर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद समुद्रपूर पोलिसांनी घेतली आहे.

टॅग्स :Accidentअपघात