लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात येणाºया विविध मालाच्या लोडींग-अनलोडींगवर दिवसा बंदी घालून रात्रीची मुभा देण्यात आली आहे. यासाठी शहरात जड वाहनांवर सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंदीही घालण्यात आली; पण ही बंदी झुगारून अनेक वाहने शहरात शिरकाव करीत असल्याचे दिसते. यामुळे वाहतुकीचा पचका होत असल्याचे चित्र आहे. वाहतुकीचे नियम सर्रास पायदळी तुडविले जात असल्याचेच यावरून दिसून येते.वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात काही बदल करण्यात आले आहेत. काही रस्ते एकेरी करण्यात आले तर शहरात अवजड वाहनांवर दिवसा पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत कुठलीही जड वाहने शहरात शिरणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय शहरात होणारे विविध मालाची लोडींग-अनलोडींग दिवसा न करता रात्री करण्यात यावे, अशा सूचनाही दिल्या आहेत. यासाठी शहरात शिरणाºया मार्गांवर फलक लावण्यात आले आहेत. शहरातील काही मार्गांवरही जड वाहनांना प्रवेश निशिद्ध, असे फलक लावले आहेत; पण या सूचना, फलकांना न जुमानता काही अवजड वाहने शहरात शिरकाव करीत असल्याचे दिसून येत आहे.रस्त्यावर उभ्या वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. यामुळे शहरातील गोदामांमध्ये दिवसा होणारी मालाची लोडींग-अनलोडींग रात्री रहदारी नसताना म्हणजे ९ वाजताच्या नंतर करण्यास सांगण्यात आले. असे असताना काही गोदामांमध्ये दिवसाच हा प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाजी चौकातून बॅचलर रोडकडे जाणारा मार्ग जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे; पण रविवारी दुपारच्या सुमारास या मार्गावर सर्रास रस्त्यावर ट्रक उभा करून मालाची अनलोडींग सुरू असल्याचे पाहावयास मिळाले. शिवाय हे सुरू असतानाच दुसरा ट्रक शिवाजी चौकातून या मार्गावर शिरला. तसेच समोरही पावडे चौकाजवळ एक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा असल्याचे दिसून आले. यावरून वाहतूक नियंत्रक पोलीस शाखेच्या सूचनांना कुणीही गांभीर्याने घेत नसल्याचेच दिसून येत आहे. वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांवर कारवाई केली जात असताना हा प्रकार वारंवार घडत असल्याने शहरातील वाहतुकीत सुधारणा होताना दिसत नाही. वाहतूक पोलिसांनी लक्ष देत कारवाई करणे तर नागरिकांनी नियम पाळणे गरजेचे आहे.पोलीस नसल्याचा फायदाशहरातील वाहतूक व्यवस्था सुधारावी, अनियंत्रिक वाहने चालविणाºयांवर जरब बसावा, वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे म्हणून शहरात विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांना कर्तव्यावर ठेवले जाते. पोलिसांकडून चुकीचे आढळल्यास कारवाई केली जाते; पण काही चौकांमध्ये वाहतूक पोलीस कर्तव्यावर नसतात. याच संधीचा फायदा घेत वाहने जड शहरात घुसविली जात असल्याचे दिसून येत आहे. या नियमभंगामुळे शहरातील वाहतुकीचा मात्र पचका झाल्याशिवाय राहत नाही. हे प्रकार दररोज पाहावयास मिळतात. याकडे लक्ष देत अशा वाहनांवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे.पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसारच शहरात दिवसा होणारी लोडींग-अनलोडींग बंद करण्यात आली असून रात्री माल चढविणे व उतरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिवाय शहरात सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. शिवाजी चौक ते बॅचलर रोड मार्गही जड वाहनांसाठी दिवसा बंद केला आहे. शिवाजी चौकात वाहतूक पोलीस नसल्याचे पाहुन ही वाहने शहरात शिरली असावी. या प्रकरणी चौकशी करून कारवाई केली जाईल.- दत्तात्रय गुरव, पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक नियंत्रक शाखा, वर्धा.
दिवसाच लोडिंग-अनलोडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:49 AM
शहरात येणाºया विविध मालाच्या लोडींग-अनलोडींगवर दिवसा बंदी घालून रात्रीची मुभा देण्यात आली आहे.
ठळक मुद्देवाहतुकीचे नियम पायदळी : बंदीनंतरही शहरात शिरतात जड वाहने