लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगाम २०१९-२० साठी शेतकऱ्यांना बियाणे, खत व किटकनाशके उत्तम गुणवत्तेचे पुरविण्यात यावे. तसेच कुठल्याही परिस्थितीत शेतकरी नाडल्या जाऊ नये याची खबरदारी कृषी विभागाने घ्यावी. तर कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांनी शेती कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार दिल्यात.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर, कापसे, गौतम वालदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. खरीप हंगाम लागवडीसाठी पर्याप्त बियाणे उपलब्ध आहे. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर उद्भवल्यास कृषी विभागांने बियाणे उपलब्ध करुन ठेवावे. किड, अतिवृष्टी यासारख्या आपत्तीसाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून कामे करावी. मागील वर्षी शेतकऱ्यांना फवारणी करताना घडलेल्या दुर्घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणी करताना मास्क लावणे, बंद कपडे वापरणे इत्यादी विषयी जनजागृती करावी. बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी भरारी पथक तयार करावे. शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्यासाठी प्रवृत्त करावे. सोबतच प्रलंबित असलेली कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करावे, असेही भिमनवार यांनी सांगितले. विद्युत वितरण कंपनीने कृषीपंपाचे प्रलंबित असलेले कनेक्शन जोडणी करुन द्यावे. खरीप हंगाम २०१९-२० मध्ये ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टर क्षेत्र एकूण लागवडी खाली राहणार आहे. यात कापूस २ लाख ३५ हजार ५०० हेक्टर, सोयाबीन १ लाख २५ हजार २५० हेक्टर, तूर ६५ हजार हेक्टरवर लागवडीचा अंदाज आहे.७५,७६७ क्विंटल बियाणेयंदाच्या वर्षीसाठी एकूण ७५ हजार ७६७ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी २१ हजार ६७८ क्विंटल बियाणे महाबिजकडून तर ५४ हजार ८० क्विंटल बियाणे इतर कंपन्यांकडून पुरविण्यात येणार आहे. याशिवाय खरीप हंगामासाठी १ लाख २६ हजार २७० मेट्रीक टन खताची मागणी करण्यात आली आहे.८९६ शेततळे पूर्णमागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत जिल्ह्यात ३ हजार ६७३ शेतकऱ्यांचे शेततळ्यासाठी आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले आहे. तर ८९६ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करुन शेततळे पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित शेतकीऱ्यांचे तांत्रिक अडचणीमुळे अर्ज नामंजूर करण्यात आले. शिवाय काही शेतकऱ्यांनी शेततळे करण्यासाठी मशीन उपलब्ध होत नसल्याच्या कारणाने शेततळे करण्यास नापसंती दर्शविल्याचे याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांनी सांगितले. त्यावर शेतकºयांना मशीन उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.
कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही कर्ज द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 9:55 PM
खरीप हंगाम २०१९-२० साठी शेतकऱ्यांना बियाणे, खत व किटकनाशके उत्तम गुणवत्तेचे पुरविण्यात यावे. तसेच कुठल्याही परिस्थितीत शेतकरी नाडल्या जाऊ नये याची खबरदारी कृषी विभागाने घ्यावी. तर कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांनी शेती कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार दिल्यात.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या बँकांना सूचना : खरीप हंगाम आढावा बैठक, ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टर जमिनीवर होणार पिकांची लागवड