लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम: राष्ट्रीय आणि स्वातंत्र्य चळवळीच्या घडामोडी ज्या कार्यालयातून होत असे त्या बापू दप्तरच्या नुतनीकरणाला लॉकडाऊनचा फटका बसल्याने निर्धारित कालावधी पेक्षा जास्त वेळ लागणार असल्याचे दिसून येत आहे.गांधीजींनी आश्रमची स्थापना केल्यानंतर आपल्या विचारांना प्रत्यक्ष साकार करण्याचा प्रारंभ सुरू केला.आश्रमातील आदी निवास मधूनच बापू कार्य करीत होते. पण कालांतराने गरजेनुसार कुट्या बणविल्या गेल्या. यातीलच बापू कुटीच्या बाजूच्याच मीरा बहन यांच्या कुटीलाच दप्तर बणविण्यात आले. बापू आणि दप्तरमध्ये कार्य करणाऱ्यांना सुध्दा सोईचे झालेले होते.पण कालौघात कुटी झुकल्याने धोका होऊ नये म्हणून आश्रम प्रतिष्ठानने विचार विनिमयातून नुतणीकरणाचा निर्णय घेतला.तब्बल ८२ वषार्नी या कार्यालयाला नुतणीकरणाचा योग लाभला. ऐतिहासिक असल्याने अभ्यासपूर्वक आणि तसेच काम करणारे सुतार आवश्यक होते.योगायोगाने ते उपलब्ध असल्याने कामाला डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात झाली.मार्चमध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. पण कामे अत्यंत बारकाईचे असल्याने कालावधी वाढू लागला. यातच कोरोना वायरस आणि नंतर लॉकडाऊन चा परिणाम येथील कामावर झाला.आश्रमातील नियमित कर्मचारी माती आणि सारवणाचे अंतिम टप्प्यातील कामे करीत आहेत. दरवाजे तयार आहेत. सध्या तरी लॉकडाऊन दि.३ मे पर्यंत आहे.पुढे वाढतो का? हा प्रश्न आहे. यामुळे तज्ञालाही आश्रमात येऊन पाहणी करता येत नसल्याने महत्त्वाचे काम खांबलेले आहे.फ्लोरींगचे काम झाल्यावरच साहित्य ठेवण्यात येईल. त्यामुळे सध्यातरी प्रतिक्षा करावी लागेल.कोरोना वायरसचे संकट कमी झालेले नाही.लॉकडाऊन असल्याने कामात व्यत्यय आलेला असून १० मे पर्यंत काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे....टी.आर ऐन.प्रभू अध्यक्ष सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.फ्लोरींगचे महत्त्वाचे काम बाकी आहे. तज्ज्ञाचे मत घेण्यात येईल....विजय धुमाळे, विभाग प्रमुख सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.