लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम/ वर्धामहात्मा गांधीजींचे आश्रम कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे २१ दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेले आहे. आश्रमच्या इतिहासातील प्रथमच अशी घटना घडल्याची नोंद झालेली आहे.जगासमोर गांधीजींच्या वास्तव्य आणि कायार्मुळे सेवाग्राम पुण्यभूमी ठरले आहे.आश्रम कार्यकर्त्यांनी सदैव गजबजले होते.स्वातंत्र्य चळवळ आणि रचनात्मक कार्याचे जन्मस्थान बनले होते. अशा महान व्यक्तींचे तब्बल १०वर्षे वास्तव्य आश्रमात राहिले होते.आश्रम पाहायला दिवसाला ८०० ते १००० पर्यटक येत असतात. पण लॉकडाऊनमुळे आश्रमात कुणीही पर्यटक नसल्याने सर्वत्र नीरव अशी शांतता पसरलेली आहे. मात्र आश्रमातील दैनिक स्वच्छतेचे कार्य मात्र सुरक्षित अंतर ठेऊन करण्यात येत आहे. आश्रमातील शांतता आणि स्वच्छता हे वैशिष्ट्य मानावे लागेल. जी बंदमध्ये पण कायम आहे. सकाळ आणि सांयकाळची प्रार्थना सुरू आहे. गोशाळा आणि शेतातील जनावरांची देखभाल सबंधित विभागाचे कार्यकर्ते चांगल्या प्रकारे करीत आहे. सामुहिक चरखा, ग्रामोद्योग, विक्री इ. विभाग बंद ठेवण्यात आलेली आहेत. जगासाठी प्रेरणास्थान असलेले बापूंच्या आश्रमला लॉकडाऊन मुळे बंद ठेवावे लागले ही घटना इतिहासाच्या दृष्टीने महत्वाची ठरलेली आहे.जग कोरोना विषाणूच्या संकटात असल्याने देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्याने आश्रम पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेले आहे. आश्रमातील महत्वाची दैनिक कार्य सुरू आहे. इतिहासात प्रथमच बंद करण्यात आलेले आहे. पुढील सूचना येईपर्यंत प्रवेशद्वार बंद राहील तसेच क्वारंटाईनसाठी प्रतिष्ठानने यात्री निवास मधील १६ खोल्या उपलब्ध करून दिल्या असून आवश्यक ते सहकार्य आमचे राहील.टी.आर.एन.प्रभूअध्यक्ष सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.
लॉकडाऊन; सेवाग्राम आश्रम पहिल्यांदाच झाले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 12:32 PM