लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: शुक्रवारी (दि. ५) असलेल्या वटपौर्णिमेवर लॉकडाऊनचे सावट असल्याने परंपरेने पाळत आलेला हा सण स्त्रियांना यंदाही त्याच पद्धतीने साजरा करता येईल की नाही याबाबत सगळ्याच्याच मनात संभ्रम निर्माण झाला आहे.बहुतांश गावात एकाच ठिकाणी वट वृक्षाची पूजा केली जाते. या ठिकाणी महिला भगिनी एकत्र येतात पण सतत सुरू असलेले लॉक डाऊन पाहता बहुधा एकत्रित येण्याचे टाळले जात आहे. ३० मे ला लॉक डाऊन संपेल मंदिराचे दरवाजे उघडले जाईल अशी आशा असताना पुन्हा लॉक डाऊनचा कालावधी वाढला याच कालावधीत वट पौर्णिमा येत आहे. शुक्रवारी असलेल्या वट पौर्णिमा असल्याने या दिवशी मंदिरात ही जाता येईल पुन्हा लॉक डाऊन ५ सुरू झाले आणि याच दिवसात महत्व पूर्ण दिवस वट पौर्णिमेचा आला सहा हजार लोकसंख्या असलेल्या घोराड मध्ये मंदिर परिसरात असलेल्या वट वृक्षाची पूजा करण्यासाठी गावातील महिला भगिनी एकत्र येतात. त्यानंतर परिसरात असणाऱ्या सर्व मंदिरात जावून पूजा करतात हा आनंददायी दिवसावर कोरोनामुळे अडचण निर्माण झाली आहे. रामनवमी उत्सव, हनुमान जयंती कार्यक्रमांवर लॉकडाऊनमुळे विरजण पडले असले तरी स्वत:ची सुरक्षा तेवढीच महत्त्वाची असल्याने वट पौर्णिमा ही गर्दी न करता साजरी केली जाण्याची शक्यता आहे.
यंदाच्या वटपौर्णिमेवर लॉकडाऊनचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 10:26 AM