समुद्रपूर : तहसील कार्यालयाच्या परिसरात तालुका पुरवठा कार्यालय आहे. या कार्यालयात स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन विक्रेते राशन कार्ड बनविण्यासाठी येतात, परंतु कामाच्या दिवशी १ एप्रिल रोजी पुरवठा निरीक्षक कार्यालयाला कुलूप असल्याने निदर्शनास आले. त्यामुळे आलेल्या नागरिकांना आल्यापावली परत जावे लागले. ३१ मार्च रोजी डोंगरगाव येथे गॅस सिलिंडरचा स्पोट होऊन चारजण जखमी झाले. सदर सिलिंडर वैष्णवी गॅस एजन्सी समुद्रपूर येथील होते. यासंदर्भात अधिक माहिती विचारण्यासाठी पुरवठा निरीक्षक रमेश गायकवाड यांना प्रतिनिधी भेटण्यास गेले असता कार्यालयाला कुलूप दिसले. आता २ व ३ एप्रिल रोजी सुटी असल्याने जनतेची कामे चार दिवस लांबणीवर पडली आहे. वरिष्ठांनी या बाबीची दखल घ्यावी अशी मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)
सुटी नसताना पुरवठा निरीक्षक कार्यालयाला कुलूप
By admin | Published: April 02, 2015 2:04 AM