लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार आणण्यासाठी सर्वांनी भारतीय जनता पक्षाला सहकार्य करावे, असे आवाहन माजी आमदार सागर मेघे यांनी केले. वर्धा येथे आयोजित व्यापाऱ्यांसोबत संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाला राज्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे माजी आमदार सागर मेघे, खासदार व भाजप उमेदवार रामदास तडस, लोकसभा प्रमुख सुधीर दिवे, व्यापारी संघाचे अध्यक्ष अरुण काशीकर आदी उपस्थित होते.याप्रसंगी सागर मेघे म्हणाले, रामदास तडस यांच्याशी मेघे कुटुंबाचे सदैव कौटुंबिक संबंध राहिलेत व ते पुढेही कायम राहतील. त्यांना निवडून आणण्यासाठी व देशात स्थिर सरकार असावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या प्रयत्नांना आपणही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सुरुवातीला प्रक्रिया नवीन असल्याने व्यापारी वर्गाला व कर सल्लागारांना त्रास सहन करावा लागला. परंतु, व्यापारी वर्गाने समाजात व भारतीय अर्थव्यवस्थेत नेहमीच मोलाचे योगदान देणाºया जीएसटीत महत्त्वपूर्ण सूचना सुचविल्यात, याचा मला आनंद आहे. या सूचनांच्या आधारे जीएसटी कौन्सिलने एकमताने या सूचनांचा स्वीकार करून करप्रणाली सुलभ केली. यात व्यापाऱ्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. हा देश पुढे नेण्यासाठी व्यापारी बंधूंनी भाजप-शिवसेना युतीला सहकार्य करावे, असे आवाहन केले. संचालन राजकुमार जाजू, तर प्रास्ताविक अरूण काशिकर, यांनी केले. आभार श्रीनिवास मोहता यांनी मानले. बैठकीला भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी महाराष्ट्राचे सचिव जगदीश टावरी, शालिग्राम टिबडीवाल, संजय गोयनका, इद्रिस मेमन, दामोदर दरक, दिलीप कठाणे, विशाल धीरन, किशोर सुरकार, देवीदास करंडे, पंकज सराफ, नटवर रिणवा, राजकुमार जाजू, पांडू गायकवाड़, अशोक कृपलानी, ददनसिंग ठाकूर, गणेश देवानी, राजेश आहुजा, प्रवीण जैन, हरीश व्यास, श्रीकांत वाटकर, राकेश मंशानी, दीपन मिश्रा, सुरेश पंजवाणी, ढोलू आहुजा, प्रताप वाटवानी, सूरज रामानी, शेरा भाटिया तसेच बहुसंख्येने व्यापारी उपस्थित होते.