लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : काँग्रेसचा जाहीरनामा हा मेड इन पाकिस्तान आहे, तिरंगा ध्वज जाळला तरी देश द्रोहाचा गुन्हा दाखल होणार नाही. अमेठीपेक्षा वर्धा जिल्ह्याचा विकास झाला. सामान्य माणसाला कामासाठी खासदारांना भेटायला जायचे असल्यास रामदासजी ४० कि. मी. वर भेटतील, तर विरोधी पक्षाचे उमेदवार चारूलता टोकस यांना भेटायला १०९२ कि. मी. गुडगावला जावे लागेल. आपल्याला सामान्य माणूस खासदार म्हणून पाहिजे. लालमातीची कुस्ती जिंकली, त्या माणसाला लोकसभेची कुस्तीसुद्धा जिंकून घ्यायची आहे, असे आवाहन राज्याचे अर्थमंत्री, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार विद्यमान खा. रामदास तडस यांच्या निवडणूक प्रचारार्थ सिंदी रेल्वे येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार रामदास तडस, आ. समीर कुणावार, शिवसेनेचे राजेश सराफ, नगराध्यक्ष संगीता शेंडे, जि.प सदस्य विजय आगलावे, किशोर शेंडे, विनोद लाखे, किशोर दिघे, योगेश फुसे, किशोर भांदककर, सुधाकर घवघवे, पळसगावचे सरपंच धीरज लेंडे आदींची उपस्थिती होती. मुनगंटीवार म्हणाले, गुढीपाडवा म्हणजे शेतकऱ्यांची मांडवस. मांडवसीच्या दिवशी जो माणूस चांगले काम करतो, त्याला पुन्हा कामावर ठेवल्या जाते, जो काम करीत नाही, त्याला कामावरून काढल्या जाते. तडस यांनी पाच वर्षांत विकासाची चांगली कामे केली आहे. त्यांना एक्स्टेंशन द्यायचं, ११ तारखेला मत देऊन त्यांना पुन्हा कामावर ठेवायचे, अशी साद त्यांनी मतदारांना घातली.या प्रसंगी रामदास तडस यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन ओमप्रकाश राठी यांनी तर पंकज पराते यांनी आभार मानले.
Lok Sabha Election 2019; काँग्रेसचा जाहीरनामा ‘मेड इन पाकिस्तान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 11:44 PM
काँग्रेसचा जाहीरनामा हा मेड इन पाकिस्तान आहे, तिरंगा ध्वज जाळला तरी देश द्रोहाचा गुन्हा दाखल होणार नाही. अमेठीपेक्षा वर्धा जिल्ह्याचा विकास झाला. सामान्य माणसाला कामासाठी खासदारांना भेटायला जायचे असल्यास रामदासजी ४० कि. मी. वर भेटतील,....
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : सिंदी (रेल्वे) येथील सभेत टीका