शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

Lok Sabha Election 2019; वर्धा जिल्ह्यातील देवळी विधानसभा मतदार संघ प्रतिष्ठेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 8:27 PM

वर्धा लोकसभा मतदार संघात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी व भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारात थेट लढत आहे.

ठळक मुद्देआर्वीत गणित काळेंवर अवलंबून कुणावार, जगताप, भोयर, बोंडे, केचे प्रचारात मैदानात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी व भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारात थेट लढत आहे. मात्र या लढतीत काही गावे अंत्यत निर्णयक ठरणारी आहे. याच गावावर लोकसभा निवडणुकीचा निकालही अवलंबून राहणार आहे. त्यामुळे या गावांवर आता अंतिम टप्प्यात उमेदवारांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये देवळी विधानसभा मतदार संघ अंत्यत महत्वाचा की-पॉर्इंट आहे. या मतदार संघात आ. रणजीत कांबळे हे आमदार आहेत. त्यामुळे चारूलता टोकस यांच्या येथून अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी ते कामाला लागले आहे. मात्र या मतदार संघात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची पूर्ण साथ कॉँग्रेसला मिळण्याची शक्यता दिसत नाही. मात्र प्रभाताईराव यांची कर्मभूमी असलेल्या या भागात जातीचाही मोठा आधार उमेदवारासाठी ‘आधार’ आहे. याशिवाय आर्वी विधानसभा मतदार संघात कॉँग्रेसचा आमदार आहे. त्यांना स्वत:ला आपण या मतदार संघात प्रबळ आहो, हे दाखविण्याची या निवडणुकीच्या निमित्ताने संधी आली आहे. त्यामुळे त्यांनी चारूलता टोकस यांचा प्रचार सुरू केला आहे. या भागात बसपा उमेदवार शैलेश अग्रवाल हे स्थानीक असल्याने ते येथे मत घेण्याची शक्यता आहे. हत्तीने मुसंडी मारल्यास कॉँग्रेसला मोठा फटका बसू शकतो, अशी स्थिती आहे. शिवाय भाजपच्या प्रचारात येथे केचे, दिवे असे डबल इंजिन काम करीत आहे. त्यामुळे या मतदार संघाच्या मताधिक्यावर सर्वांची नजर आहे. २०१४ मध्ये भाजपने येथून आघाडी घेतली होती. ती आघाडी आता वाढतेय काय? याकडे अनेकांचे लक्ष आहे. वर्धा विधानसभा मतदार संघात भाजप उमेदवाराला जातीचा फायदा सहजपणे मिळण्याची शक्यता आहे. कॉँग्रेसचा प्रचार येथे तगडा असला तरी कॉँग्रेसला या मतदार संघात बरेच पाणी तोडावे लागणार आहे. हिंगणघाट विधानसभा मतदार संघात भाजपचे आ. समीर कुणावार यांचा दांडगा जनसंपर्क भाजपची सर्वाच मोठी जमेची बाजू आहे. नाराजांची संख्या अंत्यत कमी आहे. शिवाय राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रचंड वाद आहे. शिवसेनेचे नेते अशोक शिंदे भाजपसोबत आल्याने येथे कॉँग्रेसला आघाडीची शक्यता कमी आहे. मात्र धामणगाव (रेल्वे) मतदार संघात कॉँग्रेसचे आमदार विरेंद्र जगताप यांचा जनसंपर्क व स्वभाव या त्यांच्या जमेच्या बाजू आहे. त्यांचा फायदा कॉँग्रेस उमेदवाराला होईल. येथे त्यामुळेच मताधिक्याची आशा आहे. मोर्शीमध्ये गेल्या वेळपेक्षा यावेळी भाजपची मताधिक्य वाढण्याची शक्यता आहे. सेनेची चांगली साथ भाजपला आहे.

तीन उमेदवारांचे होल्ड असलेले हे आहेत प्रमुख विभाग, गावरामदास तडस यांना २०१४ च्या निवडणुकीत सव्वा दोन लाखांची आघाडी मिळाली होती. सहाही विधानसभा क्षेत्रात भाजपने जोरदार मुसंडी मारली होती. कॉँग्रेसपेक्षा अधिक मताधिक्य त्यावेळी भाजपला होते. त्यामुळे भाजप ५ लाखांवर पोहचू शकला.चारूलता टोकस या पहिल्यांदाच लोकसभेच्या मैदानात आहे. त्यांच्या मताधिक्यासाठी त्यांचे मावस बंधू आ. रणजीत कांबळे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. त्यांच्या देवळी विधानसभा मतदान क्षेत्रावर साऱ्यांच्या नजरा आहे. येथे त्यांना मताधिक्याची आशा आहे.शैलेश अग्रवाल बसपाच्या हत्तीवर स्वार झाले आहे. वर्धा जिल्ह्यात काही गावे असे आहेत की त्या ठिकाणी बसपाचे परंपरागत मतदार आहे. प्रत्येक निवडणुकीत बहुजन समाज पक्ष तेथे बाजी मारतो. यात पुलगावचाही समावेश आहे.२००९ मध्ये दत्ता मेघे निवडून आले होते. त्यांना विविध मतदारसंघांमध्ये चांगली आघाडी होती. त्यामुळे भाजपचा पराभव झाला.२०१४ मध्ये काँग्रेस पक्षाच्या आमदार असलेल्या मतदार संघात पक्षाला मते मिळाली नाहीत. त्यामुळे पराभव झाला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019