शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

Lok Sabha Election 2019; ड्रायपोर्टमुळे लोकांना रोजगार मिळेल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 9:33 PM

सिदी रेल्वे येथील ड्रायपोर्टमुळे पुढील दहा वर्षांत ५० हजार लोकाना रोजगार निर्मिती होत अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ठळक मुद्देहिंगणघाट येथील जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राज्यात पाच लाख बेघरांना घरे दिली. देशात २०२४ पर्यंत एकही बेघर राहणार नाही, हा आमचा संकल्प आहे. मुद्रा योजनेत १३ कोटी लोकांना कर्ज दिले. शिवाय रोजगार निर्माण केला. श्रमेव जयते योजनेत ६० वर्षांवरील कामगारांना तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. सात बारा कोरा होईपर्यंत कर्ज माफी योजना थांबविण्यात येणार नाही. इतकेच नव्हे तर सिदी रेल्वे येथील ड्रायपोर्टमुळे पुढील दहा वर्षांत ५० हजार लोकाना रोजगार निर्मिती होत अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.ते भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ गोकुलधाम मैदानावर आयोजित जाहीर सभेत बोलत होते. व्यासपीठावर खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार अशोक शिंदे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश सराफ, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष अभिनंदन मुनोत, शिवसेना शहर प्रमुख मुन्ना त्रिवेदी, समुद्र्रपूर पं.स. सभापती कांचन मडकाम, पं. स. सभापती गंगाधर कोल्हे, डॉ. शिरीष गोडे, नगराध्यक्ष प्रेम बसतांनी रिपाइंचे विजय आगलावे, मुस्लिम आघाडीचे बिस्मिल्ला खाँ आदींची उपस्थिती होती.मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाजे, येती लोकसभा निवडणूक ही देशाचे भविष्य आणि भवितव्य कोणाच्या हाती द्यायचे, देशात विकास व सुरक्षा कोण देऊ शकतो याचा निर्णय घेणारी आहे. त्यामुळेच देशाचा स्वाभिमान आणि अभिमान कायम ठेऊन आन-बाण-शान कायम ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा आघाडीला भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर कडाडून टीका करीत केंद्र व राज्यातील भाजपाने सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. जनधन योजनेच्या माध्यमातून ३५ कोटी गरिबांची खाते उघडली. उज्ज्वला गॅस योजनेत ६ कोटी कुटूंबांना घरगुती गॅस सिलिंडर देण्यात आले. शौचालय केवळ ४५ टक्के लोकांकडे होती ती चार वर्षांत ९८ टक्के घरापर्यंत पोहचली आदी माहिती दिली. यावेळी खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, माजी आमदार अशोक शिंदे, रिपाइंचे विजय आगलावे, शिवसेनेचे राजेश सराफ यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन किशोर दिघे व राकेश शर्मा यांनी केले.राहूल गांधींचे भाषण काल्पनिक पात्रा प्रमाणेकाँग्रेसने ६० वर्षांत या देशाची वाट लावली आहे. काँग्रेसला मते मागतांना लाज का वाटत नाही. काँग्रेसने गरीबी हटावचा नारा पणजोबा, आजी, वडील व आई यांनी सातत्याने जाहिरनाम्यातून दिला, तोच नारा आज राहुल गांधी देत आहेत. गरीबी तर हटली नाही; पण काँग्रेस पक्षातील नेते व त्यांचे चेले चपाट्यांची गरिबी हटली. या उलट मोदीजी हे सातत्याने गरीबी नष्ट करण्यासाठी उपाययोजना करीत आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधी यांची भाषणे मनोरंजन करणारी असून टीव्ही मालिकेतील काल्पनिक पात्रा प्रमाणे असतात, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ईएसआयसी योजनेचा १५ हजार कामगारांना फायदा - कुणावार७६८ कोटी रुपायांच्या योजना आपण चार वर्षात आणल्या. मी जी योजना या मतदार संघासाठी मागितल्या त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला झाला. नझुल जागा, ग्रामीण भागातील अतिक्रमण पट्टे मंजूर, कामगार यांना ईएसआयसी योजनेचा १५ हजार कामगारांना फायदा झाला. समाधान शिबीर अंतर्गत वर्ग २ ची जमीन १ करणे, टेक्स टाईल्स पार्क मध्ये ३०० कोटी रुपये निवेश असून १ हजार २०० लोकांना रोजगार मिळाल्याचे यावेळी आ. समिर कुणावार यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019