लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : येथील मतदारयादीत अनेकांची नावे नसल्याने मतदारांना नावे शोधण्यासाठी दिवसभर पायपीट करावी लागली. आॅनलाईन सर्च करून सुद्धा नावे मिळत नसल्याने एकच गोंधळ उडाला. बहुतेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले.स्थानिक न.प. क्षेत्रातील मतदान एकूण पाच प्रभागांत समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे प्रभागाप्रमाणे मतदारांची सूची अपेक्षित होती. परंतु, असे न करता पाचही प्रभागांतील मतदारांची नावे एकमेकांत टाकून गुंतवणूक करण्यात आली. त्यामुळे मतदारांना आपली नावे शोधण्यासाठी सर्व प्रभागाची मतदार यादी पडताळून पाहावी लागली. यातही अनेकांची नावे मतदार सूचीतून गायब असल्याने आॅनलाईन सर्च करावी लागली. यात काहींची नावे मिळाली, तर अनेकांची नावे गहाळ दिसली. मोबाईलची नेट सिस्टीमसद्धा काम करीत नसल्याने नावे मिळण्यास अडचण निर्माण झाली.सकाळपासून शहरातील मतदारांत उत्साह पाहण्यात आला. मतदारांनी स्वयंस्फूर्तीने प्रक्रियेत सहभाग दिला. भाजपाचे उमेदवार व विद्यमान खासदार रामदास तडस यांनी कुटुंबीयांसमवेत यशवंत कन्या शाळेच्या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. कॉँग्रेसच्या उमेदवार अॅड. चारूलता टोकस यांनी कोल्हापूर (राव) मुक्कामी मतदान केले. मतदानात उत्साह असला तरी मतदारातील घोळामुळे मतदानाच्या टक्केवारीत घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Lok Sabha Election 2019; यादीत नावे नसल्याने मतदारांची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 10:51 PM
येथील मतदारयादीत अनेकांची नावे नसल्याने मतदारांना नावे शोधण्यासाठी दिवसभर पायपीट करावी लागली. आॅनलाईन सर्च करून सुद्धा नावे मिळत नसल्याने एकच गोंधळ उडाला. बहुतेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले.
ठळक मुद्देआॅनलाईन सर्च करूनसुद्धा नावे न मिळाल्याने गोंधळ