लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कॉँग्रेस शेतकऱ्यांचा लढा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळेच कॉँग्रेससोबत स्वाभीमान शेतकरी संघटना, रिपाई आदीसारखे पक्ष सोबत आले आहे. देशाचा पंतप्रधान शेतकरी, शेती याविषयी काहीही बोलत नाही. आम्ही गांधींच्या भूमितून गांधींचे विचार पुढे नेण्यासाठी काम करणार आहो, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.या सभेला कॉँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी उपस्थित होते. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टिका केली. पंतप्रधानांना शेतकरी व गरीबांशी गळा मिळविताना कुणीही पाहिले नाही. ते अंबानी, अदानी यांच्याशीच गळा मिळवितात. ते श्रीमंताचे चौकीदार आहे, असा उल्लेखही त्यांनी केला. या सभेला स्वाभीमान शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी, रिपाई (ग.) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई, कॉँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे प्रदेशाध्यक्ष राजू वाघमारे यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी कॉँग्रेसने संविधानाचे रंक्षण करण्याचे काम केल्याचे सांगितले. तब्बल ३३ मिनीटे राहुल गांधी यांनी सभेला मार्गदर्शन केले. सभेचे प्रास्ताविक धामणगाव (रेल्वे) चे आमदार विरेंद्र जगताप तर आभार जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी मानले.
उमेदवाराने नाही साधला मतदाराशी संवाद लोकसभा मतदार संघात कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांची जाहीर सभा शुक्रवारी पार पडली. या जाहीर सभेला उमेदवार अॅड. चारूलता टोकस उपस्थित होत्या. परंतु त्यांनी राहुल गांधी येण्यापूर्वी किंवा राहुल गांधी आल्यानंतर सभेला आलेल्या मतदाराशी संवाद साधला नाही. त्यामुळे मतदारांमध्ये याची चर्चा दिसून आली.
अन् भाषणादरम्यान सुरक्षा रक्षकाने दिली चिठ्ठी राहूल गांधी यांचे हेलिकॉप्टम ५.०५ वाजता वर्धेच्या आकाशात झळकले. हे हेलिकॉप्टर ५.०७ वाजता हेलिपॅडवर लॅन्ड झाल्यानंतर राहूल गांधी हे सभा स्थळ गाठून ५.१४ वाजता व्यासपीठावर चढले. राहूल गांधी हे भाषण देत आताना एका सुरक्षा रक्षकाने ५.५४ वाजता एक चिठ्ठी त्यांना दिली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी राहूल गांधी यांनी भाषण आटोपले, हे विशेष.