लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा:गेल्या ५० वर्षात काँग्रेस सरकारच्या राजवटीत शेतकऱ्यांची दैनीय अवस्था झाली. काँग्रेस सत्तेवर असतांना त्यांना शेतकऱ्यांची चिंता नव्हती. आता निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खोटे वचन देण्याचे काम काँग्रेस करत आहे. या काँग्रेसला गांधी जिल्ह्यातून लोकसभा निवडणुकीत हद्दपार करा असे आवाहन राज्याचे अर्थनियोजन व वनमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस यांच्या निवडणुक प्रचारार्थ सेलू तालुक्यातील हिंगणी, वर्धा तालुक्यातील वायगाव (नि.) व कारंजा (घाडगे) येथे आयोजीत जाहीर सभेत ते बोलत होते. मोदीजींच्या नेतृत्वात सरकारने २०२२ पर्यंतच्या योजना आखल्या आहे. प्रत्येक गरीबाला घर दिले जाणार आहे. असे त्यांनी वायगाव येथे सभेत सांगितले.या सभेत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी राव यांच्या कुटूंबातील घराणेशाहीवर टिका केली. मागील ४ महिण्यांपासून उमेदवार वर्धा जिल्ह्यात राहण्यासाठी आले असेही ते म्हणाले. वायगाव येथील सभेला शिवसेना जिल्हाप्रमुख बाळा शहागडकर, राजेश सराफ, रिपाईचे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे, किरण उरकांदे, रमेश वाळके, संजय गाते, अनंत देशमुख, माजी खासदार सुरेश वाघमारे, डॉ.शिरीष गोडे, प्रशांत इंगळे तिगावकर, गुंडू कावळे, वायगावचे सरपंच प्रवीण काटकर, मिलींद भेंडे, किशोर गावळकर उपस्थित होते.हिंगणी येथील जाहीर सभेतही मुनगंटीवार यांनी काँग्रेस वर सडकून टिका केली. या सभेला आमदार डॉ.पंकज भोयर यांनी मार्गदर्शन केले.प्रास्ताविक हिंगणीच्या सरपंच शुभांगी मुडे यांनी केले. या सभेला मारोतराव मुडे, सोनाली कलोडे, अशोक कलोडे, जि.प.सदस्य राणा रननवरे, विलास वरटकर, योगेश रननवरे,योगेश इखार, नरहरी चहांदे , अशोक मुडे, कुंदा खडगी, संजय अवचट, सुनिता ढवळे, जि.प.सदस्य नुतन राऊत आदी उपस्थित होते.
वन्यजीवांनी शेतीच्या केलेल्या नुकसानीला अधिक मदत देणार - मुनगंटीवारकारंजा घाडगे - येथील जाहीर सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी जंगली श्वापदाकडून शेतीच्या होणाºया नुकसानीला जास्त मदत देण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात निर्णय घेतल्या जाणार आहे. कारंजा तालुक्याच्या विकासासाठी भाजप कठीबद्द आहे. असेही ते म्हणाले. या सभेला उमेदवार रामदास तडस, माजी आमदार दादाराव केचे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मोरेश्वर भांगे, रेवता धोटे, निता गजाम, सरिता गाखरे, रंजना टिपले, मुकूंदा बारंगे, वसंत भांगे, जि.प.उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, सुरेश खवशी, गौरीशंकर अग्रवाल, शिरीष भांगे, हरिभाऊ धोटे, चेतना मानमोडे आदि उपस्थित होते. संचालन दिलीप जसुटकर यांनी केले. यावेळी सभेत मुनगंटीवार यांना एका कार्यकर्त्यांने कारंजा पंचायत समितीचा रस्ता नव्याने बांधुन देण्याबाबत निवेदन दिले.