लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातून रिंगणात असलेले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या नेतृत्वात पदयात्रा, सभा आणि बैठकांचा धडाका सुरु झाला आहे. आमदार भोयर वर्धा शहरासह वर्धा विधानसभा मतदारसंघही पालथा घालत आहेत.भाजपाचे विद्यमान खासदार रामदास तडस यांनी लोकसभेकरिता उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच आमदार डॉ. पंकज भोयर यांनी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचाराच्या नियोजनाला सुरुवात केली होती. या मतदार संघातील वर्धा आणि सेलू तालुक्यात प्रचारार्थ कार्यकर्त्यांची फळी उभी केली. २३ मार्च ते ८ एप्रिलपर्यंत प्रचार कार्यक्रमांचे नियोजन केले. त्यानुसार दररोज प्रत्येक प्रभागात सकाळी आणि सायंकाळी प्रचार रॅली काढली जात आहे. सोबतच उमरी (मेघे), सेलू, हिंगणी येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याही सभा घेतल्या. शहरातील व्यापाऱ्यांचे सागर मेघे यांच्या उपस्थित स्नेहमसंमेलनही पार पडले.सीए आणि आयएमएच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत दलित वस्त्यांमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. मतदारसंघातील ग्रामीण भागातही पंचायत समिती सर्कलनिहाय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन उमेदवाराला मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. शहरातील सतराही प्रभागात दररोज सकाळ आणि सायंकाळी आयोजित प्रचार रॅलीला आमदार भोयर यांच्यासह नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, गटनेता प्रदिप ठाकरे, भाजपाचे शहर अध्यक्ष प्रशांत बुर्ले, प्रचार रॅलीचे संयोजक नीलेश किटे, अभिषेक त्रिवेदी, महिला मोर्चाच्या अध्यक्ष कमल गिरी यांच्यासह पालिकेचे सर्व सभापती, नगरसेवक, शक्ती केंद्रप्रमुख आणि भाजपा कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळत आहे. सोमवारी शहरातील प्रचार रॅलीचा समारोप होणार आहे.
Lok Sabha Election 2019; वर्धा मतदारसंघात पदयात्रा, सभा अन् बैठकींचा धडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 11:50 PM
वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातून रिंगणात असलेले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या नेतृत्वात पदयात्रा, सभा आणि बैठकांचा धडाका सुरु झाला आहे. आमदार भोयर वर्धा शहरासह वर्धा विधानसभा मतदारसंघही पालथा घालत आहेत.
ठळक मुद्देभाजपाच्या प्रचारार्थ मतदारसंघ घातला पालथा