पुरुषोत्तम नागपुरे।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी लोकमत प्रतिनिधीने एस.टी. च्या लाल परीतून आर्वी ते वरूड असा प्रवास मंगळवारी केला. या प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांशी संवाद साधला असता अनेक प्रवाशांनी आपल्या अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केल्या.बाबुराव गोहते नामक वरूड येथील प्रवाशाने शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांचे हीत जपणारे सरकार हवे, गरीबांचे कल्याण झाले पाहिजे, असे सांगितले. कोणता उमेदवार बाजी मारणार याविषयीही मतदारांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली. पाकिस्तानच्या विरोधात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये ३०० दहशतवादी ठार झाले, अशी खमकी हिम्मत दाखविणारे नेतृत्वच देशाला पुढे नेवू शकते, असेही तरूण प्रवाशांचे मत पडले. वरूड येथील वॉर्ड क्रं. १८ मधील केदार चौक येथील निवासी ज्योती प्रकाश शिरभाते यांनी विद्यमान केंद्रसरकारच्या कामगिरीचे कौतुक केले. मात्र गरिबांसाठी आणखी योजना हव्या, असे सांगितले. मतदार एका दिवसाचा राजा असतो. बाकी पाच वर्षे तो गुलाम आहे. अनेक उमेदवार खासदार पाच वर्षे तोंडही दाखवित नाही, अशी प्रतिक्रिया या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी मोठा त्रास झाला. बॅँकेत वारंवार जावे लागले, असे सांगितले.संत्र्यांचे वैभव गेलेआर्वी, वरूड, मोर्शी हा संत्र्याचा पट्टा परंतु या पट्ट्यात गेल्या काही वर्षात संत्र्यांचे उत्पादन प्रचंड घटले. पाण्याअभावी संत्रा लावणे शेतकऱ्यांनी सोडून दिले. संत्र्याला गतवैभव देण्यासाठी प्रयत्न करायला हवे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.शेतमालाचा भाव दरवर्षी वाढला पाहिजे, मात्र तसे होत नाही. भावाची शाश्वती असायलाच पाहिजे. तेव्हाच शेती परवडेल, अशी भूमिका काहींनी मांडली.
Lok Sabha Election 2019; गरिबांचे भले करणारे सरकार हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 11:29 PM
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी लोकमत प्रतिनिधीने एस.टी. च्या लाल परीतून आर्वी ते वरूड असा प्रवास मंगळवारी केला. या प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांशी संवाद साधला असता अनेक प्रवाशांनी आपल्या अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केल्या.
ठळक मुद्देआर्वी ते वरूड 60 किमी