लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : भंडारा-गोंदिया-पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणावर बिघाड झाल्याने अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. प्रशासनावर फेर मतदान घेण्याची पाळी आली. त्यामुळे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका मतपत्रिकेच्या सहाय्याने घ्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मुख्य निवडणुक आयुक्त, राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत संबंधितांना सदर मागणीचे निवेदन पाठविण्यात आले आहे. लोकसभेच्या पोट निवडणुकीत अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणावर तांत्रिक बिघाड आले. मशीन बंद पडणे, बटन न दबने आदी प्रकार हे सत्ताधारी पक्षाने केलेले षडयंत्र आहे, असा आरोप या निवेदनात राकाँने केला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर ईव्हीएम उपलब्ध असताना सुरत गुजरात येथून सुमारे ३०० ईव्हीएम मशीन मागविण्यात आल्या. भाजपा वगळताच सर्वच राजकीय पक्षांनी याबाबत तक्रारी नोंदविल्या असून योग्य कार्यवाहीची ्रमागणी निवेदनातून राजू तिमांडे यांच्यासह मधुकर कामडी, नगरसेवक सौरभ तिमांडे आदींनी केली आहे.शेतकऱ्यांना त्वरित पीककर्ज वाटप करण्याची मागणीसरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी त्वरित करावी. त्यावरील व्याज माफ करावे. सन २०१८ या चालू हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप त्वरित करण्यात यावे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०० रूपये प्रति क्विंटल जाहीर केलेले अनुदान देण्यात यावे. लाल्या, तुळतुळे व बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना व कापूस उत्पादकांना घोषित केलेल्या शासकीय मदतीची रक्कम त्वरित देण्यात यावी, चणा व तुरीची नाफेडची खरेदी सुरू करण्यात यावी तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तूर व चण्याचे चुकारे त्वरित देण्यात यावे, अशी मागणी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. निवेदन देताना माजी आमदार राजू तिमांडे, संजय तपासे, विनोद वानखेडे, महेश झोटींग, वैरागडे यांनी केली आहे.
लोकसभा-विधानसभा निवडणुका मतपत्रिकाच्या साहाय्याने घ्याव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 11:07 PM
भंडारा-गोंदिया-पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणावर बिघाड झाल्याने अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. प्रशासनावर फेर मतदान घेण्याची पाळी आली. त्यामुळे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका मतपत्रिकेच्या सहाय्याने घ्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मुख्य निवडणुक आयुक्त, राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : मुख्य निवडणूक आयुक्तांना साकडे