लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सध्या सर्वत्र कॉन्व्हेंट संस्कृती आपले पायमुळ घट्ट करू पाहत आहे. त्यातच काही बोगस शिक्षकांकडून शिकवणीच्या नावाखाली विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. हा प्रकार निंदनीय असून बोगस शिक्षकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन विहिप व बजरंग दलाच्यावतीने देण्यात आले.शहरातील बनावट शिक्षकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कार्यवाही करून होणारी आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागणीवर येत्या काही दिवसात सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदन देताना विक्रम ठाकुर, विक्की कोटेवार, मंगेश बाभुळकर, सौरभ सोनटक्के, रोशन नागमोते, प्रितम कुमरे, मारुती सहारे, विक्की डाखोरे, रवी दुरबुडे, पवन भागे यांच्यासह विहिप व बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिकवणीच्या नावाखाली बोगस शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:40 PM
लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सध्या सर्वत्र कॉन्व्हेंट संस्कृती आपले पायमुळ घट्ट करू पाहत आहे. त्यातच काही बोगस शिक्षकांकडून शिकवणीच्या नावाखाली विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. हा प्रकार निंदनीय असून बोगस शिक्षकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर ...
ठळक मुद्देकारवाईची मागणी : उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना साकडे