लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : कापसाची पिके ५० टक्क्यांच्या आसपास असतानाही कापसाच्या भावात मंदीचे कारण पुढे करीत खासगी व्यापारी कापूस उत्पादकांकडून अक्षरश: आर्थिक लूट केली जात आहे.रोहणा बाजारात कापसाचे भाव ५३०० रुपयांपर्यंत खाली आले असून हा भाव शासनाच्या हमीभावापेक्षा १५० रूपयांनी कमी आहे. आता व्यापाºयांनी शेतमाल हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करण्याचा गुन्हा केला असून शासन यांच्यावर कारवाई करणार काय, असा प्रश्न शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.अर्थशास्त्राच्या नियमानुसार उत्पादन चांगले झाले, बाजारात आवक वाढली तर वस्तूचे भाव पडतात व उत्पादन घटले, आवक कमी झाली तर वस्तूंचे भाव वाढतात. पण, हा नियम इतर पक्क्या वस्तूंना लागू पडत असला तरी शेतमालाला तो बरेचदा लागू पडत नाही, असा विपरीत अनुभव यावर्षी कापूस उत्पादकांना येत आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस, आॅक्टोबर महिन्यात प्रचंड उष्णतामान व आता १० सेल्सियसपर्यंतची थंडी यामुळे डिसेंबरच्या शेवटी कापूस उलंगवाडीला आला. तज्ञांचे काहीही मत असले तरी कापसाचे उत्पन्न ५० टक्क्यांच्यावर नाही. एप्रिल-मे पर्यंत कापूस देणारी पऱ्हाटीची झाडे डिसेंबरच्या अखेरीस वाळलेली आहेत. बाजारात कापसाची आवक घटली आहे. कापूस खरेदीदार जिनिंग नियमीतपणे चालू राहावे म्हणून कापसाची वाट पाहत आहेत. एवढे असले तरी सुरुवातीला ५९०० रुपयांपर्यंत असलेला भाव रोहणा बाजारात आता ५३०० पर्यंत खाली आला. रोजची गरज व वेचणीची मजुरी देण्याच्या आवश्यकतेपोटी शेतकºयांना मिळेल त्या भावाने कापूस विकावाच लागतो. कापसाला मार्च, एप्रिल महिन्यात सहा हजार रुपये भाव मिळण्याचे संकेत असून आज मिळेल त्या भावाने शेतकºयांना कापूस विकावा लागत आहे. सुरुवातीला कापसाला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने शासनाला कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्याची गरज पडली नाही. पण आता बाजारातील भाव हमी भावाच्या खाली गेल्यावर शासनाने आपली खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांना हमीभावाचे संरक्षण देणे गरजेचे आहे. पण, त्यादृष्टीने शासनाची कोणतीच हालचाल नाही. निदान तालुका पातळीवर एका खरेदी केंद्राची व्यवस्था ठेवली असती तर व्यापार हाच कापूस हमीभावापेक्षा किमान २५ रू. अधिक देऊन खरेदी करत होते. पण शासनाची ती तयारी नसल्याने खासगी व्यापारी कापूस उत्पादकांची आर्थिक लूट करीत आहे. शासनाने खरेदी केंद्रे सुरू करावीत, शेतमाल हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करू नये, अशी शेतकºयांची मागणी आहे.कापसाला कवडीमोल भाव, तूर पीकही वाळलेचिकणी (जामणी)- चार-पाच दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकºयांच्या शेतात असलेला कापूस ओला झाला. यामुळे कापसाची प्रत घसरली व काही प्रमाणात कापूसही खराब झाला. यामुळे आता निघत असलेला कापूस व्यापारी कवडीमोल भावात मागत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.हल्ली चांगल्या प्रतीचा कापसाला ५ हजार ७००-८०० भाव आहे, तर अवकाळी पावसाने ओला झालेल्या कापसाचे भाव पाच हजार रूपयांपर्यंत असल्याचे शेतकऱ्यांकडून समजते. अवकाळी पावसामुळे भिजलेल्या कापसालासुध्दा योग्य भाव मिळावा, अशी मागणी चिकणी, जामणी, पढेगाव, निमगाव व परिसरातील शेतकरी करीत आहे. ढगाळी वातावरण व तुरळक पावसाने तूर व चणा पिकांवर अळ्यांनी हल्ला चढविला. तर काही शेतातील तूर पीक शेंगा पूर्णत: भरण्यापूर्वी वाळत आहेत. शेंगांतील दाने बारीक होत असल्याने पिकांत घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
व्यापाऱ्यांकडून कापूस उत्पादकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 11:58 PM
कापसाची पिके ५० टक्क्यांच्या आसपास असतानाही कापसाच्या भावात मंदीचे कारण पुढे करीत खासगी व्यापारी कापूस उत्पादकांकडून अक्षरश: आर्थिक लूट केली जात आहे. रोहणा बाजारात कापसाचे भाव ५३०० रुपयांपर्यंत खाली आले असून हा भाव शासनाच्या हमीभावापेक्षा १५० रूपयांनी कमी आहे.
ठळक मुद्देशासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी : हमीभावापेक्षा कमी दराने करू नये खरेदी