लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : परिसरातील तावी येथील एक शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्याला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. यात गोठ्यातील संपूर्ण साहित्य जळून कोळसा झाल्याने शेतकºयांचे सुमारे १ लाखाचे नुकसान झाले आहे. सदर आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नसून घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.प्राप्त माहीती नुसार, शेतकरी रामभाऊ झाडे रा. किन्हाळा जि. नागपूर यांची तावी शिवारात शेती आहे. त्यांनी शेतउपयोगी साहित्य ठेवण्यासाठी शेतातच गोठा तयार केला आहे. या गोठ्याला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. यात गोठ्यातील संपूर्ण शेतउपयोगी साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे शेतकरी झाडे यांचे १ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. आगीची माहिती मिळताच मोहगावचे उपसरपंच कैलास नवघरे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. शिवाय पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच गिरड पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून तपास सुरू आहे.
गोठ्याला आग लाखाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 9:26 PM