लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यामध्ये हिंगणघाट येथील महेश ज्ञानपीठ विद्यालयाचा विद्यार्थी प्रणय विलासराव शिरपुरे हा वाणिज्य शाखेतून तर हिंगणघाटच्याच जीबीएमएम कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी हिमांशू आशिषसिंह चव्हाण हा विज्ञान शाखेतून पहिला आला. दोन्ही विद्यार्थी हिंगणघाटमधील असल्याने गुणवंतांनी शहराचा बोलबाला कायम ठेवला.जिल्ह्यातील विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या चारही शाखेतून १६ हजार ७०२ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता अर्ज दाखल केले होते. १६ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १४ हजार ४८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने जिल्ह्याचा निकाल ८७.४० टक्के लागला. यात महेश ज्ञानपीठ विद्यालयाच्या प्रणय शिरपुरे याला वाणिज्य शाखेत ९७.२३ टक्के गुण मिळाले. त्याला सर्वाधिक गुण असल्याने तो जिल्ह्यातून आणि वाणिज्य शाखेतूनही प्रथम आला. तर जीएस कॉमर्स कॉलेज वर्धा येथील योगेश सुनील कोटरांगे याला ९५.२३ आणि सिद्धी किशोर उमाटे हिला ९४.७७ टक्के गुण मिळाल्याने ते अनुक्रमे द्वितीय व तृतीय आलेत. हिंगणघाटच्या जीबीएमएम कनिष्ठ महाविद्यालयातील हिमांशू चव्हाण याने ९६.७६ टक्के गुण प्राप्त करुन विज्ञान शाखेतून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला. तसेच बजाज ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स (जे.बी.सायंन्स) ची तनया नीलेश भांजळे हिने ९५.०१ टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक मिळविला आहे. हिंगणघाटच्या जी. बी. एम. एम. कनिष्ठ महाविद्यालयाची महक संजय गौतम आणि मानसी राजेशकुमार मानधनिया या दोघींनाही ९४.७६ टक्के गुण मिळाले असून दोघीही विज्ञान शाखेतून तृतीय आल्या आहे.गुणवत्तेत मुलीच ठरल्या ‘भारी’जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या चारही शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयातून ८ हजार ५८१ मुले व ८ हजार १२१ मुलींनी परीक्षेचे अर्ज भरले होते. त्यापैकी ८ हजार ५०० मुले व ८ हजार ७६ मुली अशा एकूण १६ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ७ हजार ८२ मुले व ७ हजार ४०५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यावरुन उत्तीर्ण होण्याची मुलांची टक्केवारी ८३.३२ तर मुलींची टक्केवारी ९१.६९ असल्याने मुलींनीच यावर्षी गुणवत्तेत भारी असल्याचे दिसून आले आहे.
वाणिज्यतून प्रणय, विज्ञान शाखेतून हिमांशू प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 5:00 AM
जिल्ह्यातील विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या चारही शाखेतून १६ हजार ७०२ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता अर्ज दाखल केले होते. १६ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १४ हजार ४८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने जिल्ह्याचा निकाल ८७.४० टक्के लागला. यात महेश ज्ञानपीठ विद्यालयाच्या प्रणय शिरपुरे याला वाणिज्य शाखेत ९७.२३ टक्के गुण मिळाले.
ठळक मुद्देबारावीचा निकालाचा टक्का वाढला : जिल्ह्याचा निकाल ८७.४० टक्के