शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा? धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंचा संतप्त सवाल 
2
'आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है'; पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं'वर काय म्हणाले ओवेसी?
3
"पराभूत झाल्या तर मुलांचा सांभाळ करतील, याचा फायदा...", भाजप नेत्याचे RLP खासदाराच्या पत्नीबाबत विधान
4
"खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची स्टाईल", लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य, १० नोव्हेंबर २०२४ : नोकरीत फायदा होईल, सांसारिक जीवनात सुख-शांती मिळेल
6
सारंगीवादक पंडित राम नारायण यांचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
7
फुलंब्रीत प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला आग; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
8
कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!
9
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; महिलेसोबत विवस्त्र व्हिडीओ करत १० कोटींची मागितली खंडणी
10
शिवाजी पार्कवर सभेला भाजप, अजित पवार, शिंदेसेनेला परवानगी; पण उद्धव-राज यांना नाही, कारण...
11
मोठी बातमी: वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त
12
मृणाल दुसानिसचं छोट्या पडद्यावर कमबॅक, लवकरच 'या' मालिकेत दिसणार; प्रोमो रिलीज
13
ट्रक-खासगी बसची मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धडक; आठ जण गंभीर
14
विशेष लेख: ज्या भाषेत बाहेर बोलता तीच भाषा घरी वापरता का..?
15
संकटकाळी ज्यांना मदत, त्यांनीच फाेडला पक्ष; शरद पवारांचा परळीतून धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
16
मुंबईत प्रचाराच्या तोफा अद्याप थंडावलेल्याच; शेवटच्या आठवड्यात मात्र प्रचाराचा पारा चढणार!
17
दोन वर्षांच्या बालिकेची अत्याचार करून हत्या; विकृत सावत्र बापाचे निर्घृण कृत्य
18
हमास-इस्रायल युद्धात गाझाच्या ७० टक्के महिला, मुलांचा बळी गेला; युएनच्या अहवालामुळे खळबळ
19
सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा; शरद पवारांचा हल्लाबोल
20
आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची ऑफर देऊन १६ लाखांनी केली फसवणूक

By रवींद्र चांदेकर | Published: July 01, 2024 5:11 PM

गुन्हा दाखल : मोबाइलवरून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची ऑफर

वर्धा : एका अज्ञाताने वर्धा येथील एकाला मोबाइलवरून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची ऑफर देऊन जादा रक्कम मिळण्याचे आमिष दाखविण्यात आले. मात्र, १६ लाख २० हजार रुपये गुंतविल्यानंतर अज्ञाताने फसवणूक केल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या ३० मार्च २०२४ रोजी एका अज्ञात मोबाइल क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर शेअर मार्केटमध्ये बचतीच्या संबंधाने तक्रारकर्त्याला प्रमोशनल मेसेज आला. त्यावर रिप्लाय केला असता त्यांना ३१० जणांच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपला जोडण्यात आले. त्या ग्रुपवर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याबाबत प्रेरित करण्यात आले. वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगून ती रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतविण्यात येत असल्याबाबत एका संकेतस्थळाद्वारे दाखविण्यात येत होते. त्या पोर्टलमध्ये तक्रारकर्त्याने १७ एप्रिल रोजी प्रथम ५० हजारांची गुंतवणूक केली. त्या रकमेमध्ये मोठी वाढही झाली होती. त्यामुळे तक्रारकर्त्याने १८ जूनपर्यंत वेळाेवेळी १६ लाख २० हजार ३०१ रुपये आरोपीने व्हॉट्सॲपवर दिलेल्या वेगवेगळ्या अकाउंटमध्ये भरले.

रक्कम जमा झाल्यानंतर तक्रारकर्त्याने ती नंतर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, विड्रॉल होत नव्हता. अखेरीस आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी २४ जून रोजी नॅशनल सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार केली. ही तक्रार आता वर्धा येथील सायबर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध सायबर ठाण्यात भादंवि कलम ४१९, ४२० तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याचे सहकलम ६६ ड नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी व्हॉट्सॲप, टेलिग्रामच्या माध्यमातून ग्रुपद्वारे, खासगी मॅसेजवर नागरिकांशी संपर्क करतात. त्या ग्रुपमधील आरोपींचेच लोक त्यांना शेअर मार्केट गुंतवणूकीतून खूप फायदा मिळत असल्याचे दाखवून नागरिकांना प्रलोभित करतात. आरोपी नागरिकांना प्रथम फ्री डेमो देतात. नंतर छोटी गुंतवणूक करण्यास सांगून काही मोबदला देतात. त्यांची कपंनी सेबी रजिस्टर असल्याचे खोटे प्रमाणपत्र दाखवून नागरिकांचा विश्वास संपादन करतात.

अशा प्रकारच्या वेबसाइट खऱ्या शेअर मार्केटच्या डाटासोबत लिंक असलेले पोर्टल त्यांना वापरण्यासाठी देतात. आरोपी नागरिकांकडून प्राप्त रक्कम स्वतः वापरतात किंवा त्यांच्या डीमॅट अकाउंटमधून शेअर मार्केटमध्ये गुंतवितात. त्यामुळे नागरिकाना कोणताही मोबदला मिळत नाही. नागरिक पैसे विड्रॉल करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा आरोपी त्यांची रक्कम अडवून ठेवतात. अशा गुन्ह्यामधील मोबाइल नंबर व बँक अकाउंट हे गैरमार्गाने संपादित केलेले असतात. त्यांचा ते मोठ्या प्रमाणात गैरवापर करतात.

जिल्ह्यात आतापर्यंत घडली नऊ प्रकरणेवर्धा जिल्ह्यात अशी नऊ प्रकरणे आतापर्यंत उघडकीस आली. सायबर पोलिस ठाण्यात ऑनलाइन इन्व्हेस्टमेंटचे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. यात नागरिकांची एक लाख ते १६ लाखांपर्यंत फसवणूक झाली आहे. नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल १९३० वर अनेक तक्रारी चौकशीत आहेत. नागरिकांनी शेअर मार्केट गुंतवणूक ही डी-मॅट अकाउंटवरून योग्य कंपन्यांकडूनच करावी. व्हॉट्सॲप, टेलिग्रामवर येणाऱ्या अनोळखी इसमांच्या भूलथापांना बळी पडू नये. आपली रक्कम कोणत्याही कंपनी, इंटरप्रायजेसच्या अकाउंटवर टाकू नये. अनोळखी व्यक्तींना थोड्या जास्त नफ्याच्या लोभापायी आपली बँकेची अथवा आधार, पॅनकार्डची माहिती शेअर करू नये. असे गैरप्रकार निदर्शनास आल्यास जवळील सायबर सेलला तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमwardha-acवर्धा