ठळक मुद्देसापळा रचून ठोकल्या बेड्या
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: गुप्तधनाच्या लालसेपोटी साप पकडणाऱ्या टोळीला पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी पकडले.धनाचा वर्षाव करणारा पाऊस पाडणारा साप म्हणून म्हणून मांडूळ या बिनविषारी सापाबद्दल अंधश्रद्धा जनमानसात आहे. अशाच एका मांडूळ जातीच्या सापाला पकडणाऱ्या चार तरुणांना वर्धा वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी गोपुरी चौकात सापळा पकडून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मांडूळ प्रजातीचा साप जप्त करण्यात आला आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध वनविभागाकडून घेतला जात आहे. सदर साप आरोपींनी दीड लाखात खरेदी केला होतो. तो १५ लाखात विक्रीचा बेत असताना वनविभागाने आरोपींना बेड्या ठोकल्या.