लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चार विधानसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा महत्त्वाचा भाग असलेला मतमोजणी प्रक्रिया गुरूवार २४ ऑक्टोबरला होणार आहे. वर्धा जिल्ह्यातील चार जागांसाठी एकूण ४७ उमेदवार निवडणूक रिंगणात असून मतमोजणीअंती मतदारांच्या बहुमताचा कौल स्पष्ट होणार आहे.मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बदोबस्त राहणार आहे. विशेष म्हणजे १४ टेबलवरून मतमोजणीची ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ज्यांच्याकडे निवडणूक विभागाचे ओळखपत्र त्यांनाच मतमोजणी स्थळाच्या परिसरात प्रवेश राहणार आहे.सकाळी ८ वाजतापासून होणार मतमोजणीगुरूवारी सकाळी ८ वाजतापासून वर्धा जिल्ह्यातील चार ठिकाणी मतमोजणी होणार आहे. वर्धा विधासभेची मतमोजणी भारतीय खाद्य निगमच्या गोदाम परिसरात, देवळी विधानसभेची मतमोजणी तहसील कार्यालय देवळी, हिंगणघाटची उपविभागीय कार्यालय हिंगणघाट तर आर्वी विधानसभेची मतमोजणी शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालय येथे होणार आहे. सदर मतमोजणीची प्रक्रिया वर्धा येथे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश बगळे, देवळीत मनोज खैरणार, हिंगणघाटात चंद्रभान खंडाईत तसेच आर्वी येथील मतमोजणी हरिश धार्मिक यांच्या नेतृत्वात होणार आहे.जास्तीत जास्त होणार २५ फेऱ्यामतदारांच्या संख्येनुसार मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहे. यात वर्धा २५ फेऱ्या, देवळीत २४, हिंगणघाटात २५ व आर्वी २२ फेºया होणार आहेत.१६८ अधिकारी पाहणार कामप्रथम टपाली मतदानाची मोजणी होणार आहे. तर त्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणी केली जाणार आहे.आर्वी विधानसभा मतदार क्षेत्रात ६७.२५ टक्के मतदान झाले आहे.देवळी विधानसभा मतदार क्षेत्रात ६३.४९ टक्के मतदान झाले आहे.हिंगणघाट मतदार क्षेत्रात ६४.५१ टक्के मतदान झाले आहे.वर्धा विधानसभा क्षेत्रात ५३.१४ टक्के मतदान झाले आहे.जिल्ह्यातील एकूण मतदान ११ लाख ४९ हजार ९५८ इतके आहे.जिल्ह्यात यंदा एकूण ७ लाख १० हजार २१९ मतदान झाले आहे.जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी ६१.७६ इतकी आहे.जिल्ह्यातील चार ठिकाणी होणार मतमोजणीएका टेबलवर राहणार तिघांची नजरमतमोजणीसाठी प्रती टेबर दोन मतमोजणी अधिकारी व एक सुक्ष्म निरिक्षक असे तीन अधिकारी काम पाहणार आहे. एकूणच १४ टेबलवर एकूण ४२ अधिकारी एका विधानसभेसाठी तर चार विधानसभेसाठी एकूण १६८ अधिकारी मतमोजणीचे काम पाहणार आहेत.
Maharashtra Election 2019 ; ४७ उमेदवारांचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 6:00 AM
मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बदोबस्त राहणार आहे. विशेष म्हणजे १४ टेबलवरून मतमोजणीची ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ज्यांच्याकडे निवडणूक विभागाचे ओळखपत्र त्यांनाच मतमोजणी स्थळाच्या परिसरात प्रवेश राहणार आहे.
ठळक मुद्देप्रशासन सज्ज : १४ टेबलावरून चार ठिकाणी होणार मतमोजणी